Shah Rukh Khan Called Akshaye Khanna Weird: 'तू असा 'विचित्र' का आहेस?', जेव्हा किंग खाननं अक्षय खन्नाला विचारलेला हा प्रश्न; जुना व्हिडीओ तुफान व्हायरल
Shah Rukh Khan Called Akshaye Khanna Weird: एका सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटसाठी शाहरुख आणि अक्षय खन्ना एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी सर्वांसमोर शाहरुख खाननं अक्षयला विचारलेल्या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरूये.

Shah Rukh Khan Called Akshaye Khanna Weird: सध्या रणवीर सिंह (Ranveer Singh), अक्षय खन्नाच्या (Akshay Khanna) 'धुरंधर' सिनेमाची जोरदार चर्चा रंगलीय. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुवांधार कमाई केलीय. या सिनेमात अक्षय खन्नानं केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. सोशल मीडियावर अक्षय खन्नाच ट्रेंड करतोय. अशातच आता अक्षय खन्नाचे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये अक्षयनं जसा 'धुरंधर' सिनेमात डान्स केलाय, अगदी तसाच डान्स त्याचे वडील सुपरस्टार विनोद खन्ना करताना दिसतायत. तर, अक्षय खन्ना, शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही संपूर्ण स्टारकास्ट 'इत्तेफाक' सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये उपस्थित होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलेलं. हा सिनेमा धर्मा प्रॉडक्शन, शाहरुखचं रेड चिलीज आणि बीआर स्टुडिओजनं एकत्र प्रोड्यूस केलेला.
कार्यक्रमादरम्यान, करण जोहरनं अक्षय खन्नाला विनोद खन्नानं म्हटलंय की, "तुझा आवाज खूप खतरनाक आहे... किंवा असं म्हणेन की, तुला आवाजच नाहीये..." मग करण अक्षयला हसून विचारतो की, "तू असा का आहेस?" त्याचवेळी करणनं असंही स्पष्ट केलं की, अक्षय प्रमोशन इव्हेंटसाठी उपस्थित राहणं टाळत होता, त्याच्या 'स्लीपिंग पैटर्न'मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून प्रमोशन टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या शाहरुख खाननंही त्याच्या पद्धतीनं अक्षय खन्नाचं कौतुक केलं. तो म्हणाला की, "अक्षय नेहमीच थोडा वेगळा असतो. तो स्वतःच्या तालावर चालतो आणि त्यामुळेच तो खास बनतो. कधीकधी तो येतो आणि चमत्कार करतो. मला तो एक अभिनेता म्हणून खूप आवडतो... पण हो, मी हे देखील विचारू शकतो, तू असा विचित्र का आहेस?"
SRK talking about Akshaye Khanna
byu/Acrobatic_Neck_5866 inBollyBlindsNGossip
'इत्तेफाक' सिनेमात सिद्धार्थ आणि सोनाक्षी मुख्य संशयित आहेत. तर, अक्षय खन्नानं तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली. 'धुरंधर' सिनेमाबाबत बोलायचं तर, ही फिल्म 5 डिसेंबर रोजी रिलीज झाली असून सध्या भलतीच चर्चेत आहे. या सिनेमात अक्षय खन्ना, रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुनसारखे दिग्गज कलाकार आहेत. तरीसुद्धा अक्षय खन्नानं आपल्या दमदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिनेमात मुख्य भूमिका रणवीर सिंहनं साकारली आहे, पण सगळीकडून कौतुकाचा वर्षाव अक्षय खन्नावर होतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























