एक्स्प्लोर
अभिषेक बच्चनला अजय देवगण सुनावतो तेव्हा..
मला कोरोना झाला तो बाबांमुळे, असं अभिषेकने सांगितलं आणि अजय देवगणचा पारा चढला. त्याने थेट अभिषेकशी संपर्क साधला.
![अभिषेक बच्चनला अजय देवगण सुनावतो तेव्हा.. ajay devgan scolded at abhishek bachchan bollywood अभिषेक बच्चनला अजय देवगण सुनावतो तेव्हा..](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/12054707/abhishek.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अभिषेक बच्चनला कोरोना विषाणूची लागण झाली होती. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं होतं.
काही वर्षांपूर्वी जमीन नावाचा एक सिनेमा आला होता. त्यात मुख्य भूमिका होती, अजय देवगण, अभिषेक बच्चन यांची. त्यात बिपाशा बसू वगैरे लोकही होते. पण ते आत्ता महत्वाचं नाही. त्या सिनेमात अजय देवगण सैन्यातला अधिकारी असतो. तर अभिषेक बच्चन पोलीसांत काम करत असतो. अभिषेकही आधी सैन्यात असतो. पण अभिषेकच्या एका बेजबाबदार कृत्यामुळे त्याला सैन्य सोडावं लागतं आणि तो पोलीस होतो. तो सैन्यात असताना त्याचा बॉस असतो अजय देवगण. त्याच्या बेजबाबदार कृत्याबद्दल अजय देवगण त्या सिनेमात त्याला दम देतो. याच सीनची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. कारण अजय देवगणने पुन्हा एकदा अभिषेक बच्चनला सुनावलं आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन यानेच ही माहीती कपील शर्मा शोमध्ये दिली आहे. त्याला कारण ठरले अमिताभ बच्चन. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला हे आपण सगळे जाणतो. त्यानंतर अभिषेकसह अनेक बच्चन कुटुंबियांनाही कोरोना झाला. कपिल शर्मा शोमध्ये कपीलने कोरोनाबद्दलचे काही प्रश्न अभिषेकला विचारले. 'तुला करोना झालाच कसा?' असा प्रश्न विचारल्यावर अभिषेकने तात्काळ बाबांमुळे. असं उत्तर दिलं. बाबांना कोरोना झाल्यामुळे मग तो मला झाला असं अभिषेकने सांगितलं. पण अभिषेकचं हे उत्तर सिंघम अजय देवगणला रुचलं नाही. हा सगळा किस्सा अभिषेकने सांगितलाय.
अभिषेकचं हे उत्तर ऐकून अजय देवगणने तात्काळ अभिषेकशी संपर्क साधला आणि त्याला त्याच्या उत्तराबद्दल सुनावलं. अजय म्हणाला, तुला कोरोना झाला तो बाबांमुळे असं तू कसं म्हणतोस.. कारण संपूर्ण कोरोनाच्या काळात अमिताभ बच्चन कुठेत घराबाहेर पडले नव्हते. उलट तूच या काळात कामासाठी बाहेर पडलास. त्यानंतरच कोरोना बाबांना झाला असं अजयचं म्हणणं. अजयच्या या झापण्याला अभिषेकने अर्थातच आदराचं स्थान दिलं आहे. तो म्हणतो, अजय आणि बच्चन कुटुंबियांचे संबंध अगदी घरोब्याचे आहेत. त्याच प्रेमापोटी तो हे बोलला. पण सर्वसाधारणपणे असं थेट मध्ये कोणी बोलत नाही. पण अजयने ते धाडस दाखवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, अभिषेकने ते मान्य केलं.
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना कोव्हिड झाला होता. त्यानंतर आता दोघेही बच्चन कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची सध्या चालू असलेली कॉलर ट्यूनही तात्काळ बंद करावी यासाठी कोर्टात धाव घेण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांचा आवाज कोरोनाच्या काळजीच्या सूचना करण्यासाठी वापरू नयेत असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
ठाणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)