अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा भन्नाट डान्स, Zee Cine Awards चा स्टेज दणाणून सोडला; पाहा व्हिडीओ
Actress Tamannaah Bhatia dance video : अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा भन्नाट डान्स, Zee Cine Awards चा स्टेज दणाणून सोडला; पाहा व्हिडीओ

Actress Tamannaah Bhatia dance video : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Actress Tamannaah Bhatia) हिने नुकत्याच झी सिने अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात 'आज की रात मजा हुस्न का' या गाण्यावर दिलेल्या स्टेज परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली. 'स्त्री 2' चित्रपटातील या गाण्यावर तमन्नाने (Actress Tamannaah Bhatia) जबरदस्त डान्स केला असून तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालायय.. तिच्या डान्स मूव्ह्ज आणि एक्स्प्रेशन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असून, व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
अभिनेत्री तमन्ना भाटीयाने (Actress Tamannaah Bhatia) यापूर्वी अशाप्रकारे डान्स करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने बेली डान्स करत स्टेज दणाणून सोडला होत. आता ती झी सिने अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात केलेल्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमन्ना भाटिया (Actress Tamannaah Bhatia) ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने 'बाहुबली', 'जेलर', 'अरनमनई 4' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'कवाला' आणि 'अचाचो' यांसारख्या गाण्यांवरील तिच्या डान्सने सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. विशेषतः 'कवाला' गाण्यावरील तिच्या डान्स रील्सना 50 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
विजय वर्मासोबत रिलेशनशिपच्या चर्चा, मात्र आता करिअरवर फोकस
तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांचं नातं गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत होतं. त्यांनी 2023 मध्ये 'लस्ट स्टोरीज 2' या प्रोजेक्टच्या दरम्यान एकमेकांशी जवळीक साधली होती. त्यांच्या नात्याबद्दल अनेक वेळा विवाहाच्या चर्चा झाल्या, आणि तमन्नानेही एका मुलाखतीत "शादी भी हो सकती है, क्यों नहीं?" असं म्हणत त्या शक्यतेला दुजोरा दिला होता . मात्र, 2025 च्या सुरुवातीला त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो हटवले आणि तमन्नाने विजयला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं, ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, मार्च 2025 मध्ये रवीना टंडन यांच्या होळी पार्टीत दोघेही उपस्थित होते, जरी त्यांनी वेगवेगळ्या वेळेस आगमन केलं आणि एकमेकांशी संवाद टाळला . या प्रसंगाने त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना नवीन दिशा दिली. सध्या, तमन्ना आणि विजय दोघेही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या नात्याचा भविष्यकाळ काय असेल, हे वेळच सांगेल.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या























