(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahhi Vij : भर रस्त्यात बलात्काराची धमकी, अभिनेत्री माही विजने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत
Mahhi Vij : अभिनेत्री माही विज हिला एका अज्ञात व्यक्तीने भर रस्त्यात बलात्काराची धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर करत पोलिसांकडे मदत मागितली आहे.
Mahhi Vij : अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) यांची पत्नी आणि अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तिने स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. माहीने सांगितले की, भर रस्त्यात एका व्यक्तीने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर गैरवर्तन करण्यासोबतच या व्यक्तीने तिला बलात्काराची धमकीही दिली आहे. माहीने याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.
ट्विटरवर व्हिडीओ एका गाडीच्या नंबर प्लेटचा व्हिडीओ शेअर करताना माहीने लिहिले की, 'या व्यक्तीने माझ्या कारला धडक दिली आहे. एवढेच नाही, तर त्याने मला सर्वांसमोर शिवीगाळ केली. माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. या माणसाची पत्नीही माझ्याशी भांडण करत होती.’ माही विजने आपल्या ट्विटर हँडलवर मुंबई पोलिसांना हा व्हिडीओ टॅग केला आणि लिहिले की, 'कृपया या माणसाला शोधण्यात मला मदत करा. या माणसाने आम्हाला धमकी दिली आहे.’ माहीच्या या व्हिडीओमध्ये गाडीची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
मुंबई पोलिसांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर देताना लिहिले की, 'तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि या घटनेची तक्रार नोंदवा.' अभिनेत्रीने वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे. आपल्या गाडीने प्रवास करत असताना अभिनेत्रीसोबत ही घटना घडली आहे. यावेळी तिची चिमुकली लेक तारा देखील या गाडीत होती. त्या क्षणी मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटत होती. या घटनेचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते देखील यावर कमेंट करत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तर, काहींनी तिला या व्यक्तीला धडा शिकव, असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...