एक्स्प्लोर

Nirmal Pathak Ki Ghar Wapsi: वेब सीरीजमधून वैभव तत्ववादी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'निर्मल पाठक की घरवापसी' साकारणार मुख्य भूमिका!

Vaibhav Tatwawadi : 'निर्मल पाठक की घरवापसी' हा एक स्‍पेशल ड्रामा आहे, जो मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना वास्‍तविकतेची जाणीव करून देतो.

Nirmal Pathak Ki Ghar Wapsi: असे म्‍हणतात की, आपण आपल्‍या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडलो की, आपोआप आपल्यात बदल सुरू होतो आणि हीच बाब सीरीज 'निर्मल पाठक की घरवापसी' मधून (Nirmal Pathak Ki Ghar Wapsi) मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिहारमधील एका लहान शहराच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित आगामी सीरीज 'निर्मल पाठक की घरवापसी' सोनी लिव्‍हवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'निर्मल पाठक की घरवापसी' हा एक स्‍पेशल ड्रामा आहे, जो मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना वास्‍तविकतेची जाणीव करून देतो. यात अभिनेता वैभव तत्‍ववादीने (Vaibhav Tatwawadi) निर्मल पाठक या तरूणाची भूमिका साकारली आहे, जो 24 वर्षांनंतर त्‍याच्‍या मूळगावी परतला आहे आणि त्‍याची कथा त्‍याचे मूळ शोधण्‍याच्‍या प्रवासाच्‍या अवतीभोवती फिरते. वैभव तत्‍ववादीप्रमाणेच निर्मल पाठक लाजाळू व संकुचित वृत्तीचा आहे आणि याच बाबीमुळे त्‍याला सहजपणे भूमिकेमध्‍ये सामावून जाता आले, असे वैभव सांगतो.

मी देखील निर्मल पाठकसारखाच!

'निर्मल पाठक की घरवापसी'च्‍या संकल्‍पनेबाबत सांगताना वैभव म्‍हणाला, ‘ही सीरीज आपल्‍या समाजाबाबत बरेच काही सांगते आणि मला या सीरीजचा भाग असण्याचा आनंद होत आहे. ही आपले मूळ शोधणाऱ्या मुलाची कथा आहे. सीरीजच्‍या नावाशी संलग्‍न भूमिकेचे नाव असण्‍याची भावना नेहमीच खूप खास असते.’

आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना तो म्‍हणाला की, ‘मी वास्‍तविक जीवनातही निर्मल पाठकसारखाच आहे. पटकथा वाचल्‍यानंतर मला समजले की, तो माझ्यासारखाच लाजाळू आहे, कमी बोलणारा आहे आणि याच गोष्‍टीशी मी सहजरित्‍या संलग्न होऊ शकतो.’ 

‘हे’ कलाकर झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

नरेन कुमार हे 'निर्मल पाठक की घरवापसी'चे शो रनर आहेत. या सीरीजचे लेखन राहुल पांडे यांनी केले असून, दिग्‍दर्शन राहुल पांडे व सतिश नायर यांनी केले आहे. कायरा कुमार क्रिएशन्‍स निर्मित या सीरीजचे निर्माते नरेन कुमार व महेश कोराडे आहेत. या सीरीजमध्‍ये वैभव तत्‍ववादी, अल्‍का आमिन, विनीत कुमार, पंकज झा, आकाश मखिजा, कुमार सौरभ, गरिमा श्रीवास्‍तव आणि इशिता गांगुली हे कलाकार आहेत. 'निर्मल पाठक की घरवापसी' ही सीरीज 27 मेपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
Embed widget