Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने ईडीकडे (ED) दोन आठवड्यांचा वेळ मागितला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून महादेव बुक अॅप प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता रणबीर कपूरला शुक्रवारी चौकशीसाठी देखील बोलवले होते.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रणबीर कपूर याने महादेव बुक अॅपसाठी जाहिरात केली होती. या जाहिरातीमधूल त्याला रोख रक्कम देखील मिळाली होती असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या प्रकरणात अभिनेते रणबीर कपूरची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
नेमंक काय आहे प्रकरण?
बॉलिवूड सिनेसृष्टीमधला आघाडीचा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. 'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान रणबीर कपूर या अॅपचे प्रमोशन करत होता, असा ईडीने दावा केलाय. या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे.
काय आहे महादेव बुक अॅप?
महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल अशा विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. भारतातील विविध निवडणुकांवर सट्टा लावण्यात येतो. त्यामुळे रणबीर कपूरकडून या सट्ट्याच्या अॅपचे प्रमोशन करण्यात येत होते, असं म्हटलं जातं आहे.
या अॅपचं नेमकं काम काय?
हे अॅप UAE च्या बाहेर आधारित आहे. अॅपच्या युजर्ससाठी, अधिक ग्राहकांना वळण्यासाठी त्यांचे कॉल सेंटर्स आहेत. हे कॉल सेंटर्स नेदरलँड, नेपाळ, श्रीलंका, यूएई मधून चालवण्यात येतात. जेव्हा ग्राहक या केंद्रावर कॉल करतात तेव्हा त्यांना एक व्हॉट्सअॅप नंबर दिला जातो, जिथे त्यांना त्यांचे तपशील शेअर करावे लागतात. त्यानंतर हा तपशील भारतातील पॅनेल ऑपरेटरसोबत शेअर केला जातो. जे प्रामुख्याने भारतातील शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि चंदिगड, छत्तीसगडमधील काही लहान शहरांमध्ये कार्यरत आहेत.
असे 4000-5000 पॅनेल ऑपरेटर आहेत. हे पॅनल ऑपरेटर UPI आणि बँक खात्यांद्वारे ग्राहकांशी बँक व्यवहार सुरू करतात.या पॅनल ऑपरेटर्सची बनावट बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये पैसे वळवले जातात. प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, त्यांना त्यांच्याद्वारे अॅपवर भरलेल्या रक्कमेच्या 60 टक्के परत दिले जातात.
दरम्यान आता अभिनेता रणबीर कपूर हा ईडीच्या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार का. तसेच या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Ranbir Kapoor: रणबीर कपूरला ईडीचं समन्स; 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?