Ranbir Kapoor: रणबीर कपूरला ईडीचं समन्स; 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Ranbir Kapoor: महादेव बुक ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे.
Ranbir Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश ईडीनं रणबीर कपूरला दिला आहे. 'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीर कपूर हा अॅपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीनं केला आहे.
'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे. सौरभवर स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होची. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीमध्ये महादेव बुक अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. सौरभचे लग्न दुबईत अतिशय थाटामाटात पार पडले. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, असं म्हटलं जात आहे. लग्नात अनेक स्टार्सनी परफॉर्म देखील केलं होतं.
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. त्या दरम्यान 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले. महादेव अॅपच्या संस्थापकाचे आणखी 4 ते 5 असेच अॅप आहेत. या अॅप्सचे कॉल सेंटर श्रीलंका, नेपाळ, यूएई येथे आहेत.
Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on 6th October, in connection with Mahadev betting app case
— ANI (@ANI) October 4, 2023
(file photo) pic.twitter.com/K8DZhME5RK
रणबीर कपूरचे चित्रपट
मार्च महिन्यामध्ये रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट रिलीज झाला. आता रणबीरचा 'अॅनिमल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरमधील रणबीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
संबंधित बातम्या: