Actor Died : काही दिवसांपासून बेपत्ता होता अभिनेता, आता मृतदेहच सापडला; बहिणीने सोशल मीडियावर दिली माहिती...
Actor Dies : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेला अभिनेता जेम्स हॉलक्रॉफ्ट यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Actor James Hollcroft Found Dead : ‘कोमो डायस एल डिचो’ या टेलिव्हिजन शोमध्ये काम करणारा अभिनेता जेम्स हॉलक्रॉफ्ट याचं निधन झालं आहे. 3 सप्टेंबर 2024 पासून तो बेपत्ता होता. आता त्याचा मृतदेह सापडला आहे. जेम्स हॉलक्रॉफ्टच्या बहिणीने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून सोशल मीडियावर तिने एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. जेम्स हॉलक्रॉफ्ट हा अवघ्या 26 वर्षांचा होता,
'द मिरर यूएस'च्या वृत्तानुसार, जेम्स हॉलक्रॉफ्टची बहीण जेन हॉलक्रॉफ्टला तिच्या भावाच्या अचानक मृत्यूने धक्का बसला आहे. जेम्स हॉलक्रॉफ्टच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. पण जेम्स मेक्सिको सिटीतील टिझापन येथे घरी परतत असताना बेपत्ता झाला होता, अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली.
View this post on Instagram
बहिणीने दिली श्रद्धांजली...
जेनने तिच्या भावाची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जेनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन, आपण एकत्र घालवलेल्या वर्षांसाठी आणि मला आतापर्यंतचे सर्वात चांगल्या आठवणी देण्यासाठी धन्यवाद...तू नेहमीच आमच्या हृदयात उपस्थित राहशील.' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'आम्हाला तुझी खूप आठवण येईल...'
त्यांचे मेहुणे जेम्स हॉलक्रॉफ्ट यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले की,'आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तुझ्या बातमीमुळे माझे मन तुटले आहे. आज इथं आयुष्याच्या रंगमंचावरील पडदा पडला. पण, मला माहित आहे की तू स्वर्गात आहे. आणि तिथेही तू आपली छाप सोडत असणार.
मित्र जर्मेन लोपेझनेही एक पोस्ट लिहिली
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, जेम्स हॉलक्रॉफ्टचा मित्र जर्मेन लोपेझने देखील एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली, 'तुझ्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे, माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी शब्द नाहीत, तुझ्या आत्म्याला शांती लाभो मित्रा, अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्यात.