(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dagadi Chawl Theme Decoration : गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!
Dagadi Chawl Theme Decoration : 'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे.
Dagadi Chawl Theme Decoration : सध्या सगळीकडे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा (Ganeshotsav 2022) गजर ऐकू येतोय. आपल्यापैकी अनेकांच्या घरी तर, अनेकांच्या इमारतीत, चाळीत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सगळ्याच सणांमध्ये शुकशुकाट होता. मात्र, यंदा कोरोना आटोक्यात आला आणि निर्बंध देखील शिथिल झाले. यामुळेच यंदा गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. गेल्या 2 वर्षांची कसर यंदा भरून निघणार, असे एकंदर चित्र दिसत आहे. आता गणपती बाप्पा आलेयत म्हणजे सगळीकडेच सजावट, फुलांची आरास, देखावे, रांगोळी अशी मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यातच यंदा चर्चेचा विषय ठरलीय ‘दगडी चाळी’वर (Dagadi Chawl) आधरित सजावट!
गणेशोत्सवात दिसणारे देखावे हे जितके सुंदर आपल्याला दिसतात, तितकीच मेहनत ते देखावे बनवताना लागते. असाच एक आगळा वेगळा गणपती देखावा अनुष्का पाटील हिने साकारला आहे. आता आगळा वेगळा म्हणजे नक्की कसा? हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला...
‘दगडी चाळ 2’मधून मिळाली प्रेरणा!
नुकताच प्रदर्शित झालेल्या मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप व चंद्रकांत कणसे दिग्दर्शित सुपरहिट 'दगडी चाळ 2'साठी (Dagadi Chawl) चित्रपटगृहात प्रेक्षकांची रांग लागली असून, चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने घराघरात लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे अशा मातब्बर कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. याच चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला. या देखाव्याबद्दल सांगताना अनुष्का खूपच उत्सुक दिसली. आपण अभिनेता अंकुश चौधरीची प्रचंड मोठी फॅन असल्याचे तिने सांगितले. 'दगडी चाळ 2' हा चित्रपट अनुष्काला फार आवडला आणि म्हणूनच ही आगळी वेगळी थिम निवडली असल्याचे तिने सांगितले.
अंकुश चौधरीनेही केलं कौतुक!
या फॅनगर्ल अनुष्काची ही हटके थीमची चर्चा आता अंकुश चौधरीपर्यंत (Ankush Chaydhary) पोहोचली आहे. याबद्दल बोलताना अंकुश चौधरी म्हणाला की, ‘प्रेक्षकांचं हे प्रेम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अनुष्काने खरंच खूप सुंदर असा दगडी चाळीचा देखावा मांडला. 'दगडी चाळ 2' या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. अनुष्काला आणि माझ्या सर्वच रसिक प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद. बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांच प्रेम असंच पाठीशी राहो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना.’
हेही वाचा :