करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?
Abhishek Bachchan karisma Kapoor : करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?

Abhishek Bachchan karisma Kapoor : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री करिश्मा कपूर (karisma Kapoor) हे कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. 1997 मध्ये राज कपूर यांचे नातू निखिल नंदा लग्नाच्या वेळी अभिषेक आणि करिश्माची पहिली भेट झाली होती. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम फुलले. जवळपास पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी आपले नाते अधिकृत केले. बऱ्याच लोकांना वाटत होते की हे दोघं लवकरच लग्न करणार.
अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिनी दोघांचा साखरपुडा
अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला होता. करिश्मानेही एका मोठ्या आणि प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होण्याबाबत आनंद व्यक्त केला होता. मात्र काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि नाते तुटले.
अचानक मोडलेला साखरपुडा – काय होती कारणं?
करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा अगदी आनंदात झाला होता, पण काही महिन्यांत तो मोडला होता. दोन्ही कुटुंबीयांनी ब्रेकअपचे अधिकृत कारण दिले नाही. पण काही माध्यमांनी काही अंदाज लावले.
बबीता यांच्यामुळे तुटले नाते?
कॉस्मोपॉलिटन या प्रसिद्ध मासिकाच्या जुन्या रिपोर्टनुसार, करिश्माच्या आई बबीता यांना अभिषेकच्या आर्थिक स्थैर्याबाबत चिंता वाटत होती. रणधीर कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर बबीता यांनी आपल्या मुली करिश्मा आणि करिनाला स्वत: कष्टाने वाढवले होते. त्या नेहमीच प्रॅक्टिकल आणि प्रोटेक्टिव्ह होत्या. त्या करिश्माच्या भविष्यातील सुरक्षिततेबाबत जागृत होत्या. त्या काळात करिश्मा बॉलिवूडमध्ये एक आघाडीची अभिनेत्री होती, तर अभिषेक अजून स्वतःचं स्थान बनवण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी बच्चन कुटुंबही आर्थिक अडचणीत होतं.
बबीता यांनी मांडली होती ‘अॅग्रीमेंट’ची अट
बबीता यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी मागणी केली होती की अभिषेकला संपत्तीतून काही भाग दिला जावा, जेणेकरून करिश्माची आर्थिक सुरक्षितता निश्चित होईल. मात्र बच्चन कुटुंबाने ही अट मान्य केली नाही, आणि त्यामुळेच त्यांच्या साखरपुड्यात खळबळ उडाली आणि नातं तुटलं, असं म्हटलं जातं.
अजून काही कारणं – करिश्मावर अभिनय सोडण्याचा दबाव?
अशीही अफवा होती की करिश्मावर तिचा अभिनय कारकिर्द सोडण्याचा दबाव होता. तसेच जया बच्चन या अभिषेकच्या निर्णयांवर खूप प्रभाव टाकत होत्या. मात्र, या नातं तुटण्यामागचं खरं कारण आजही गूढच आहे.
नंतर काय घडलं?
अभिषेक बच्चन नंतर ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला आणि 2007 मध्ये त्यांचं लग्न झालं. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या वैवाहिक नात्याबाबत काही तणावाच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दोघांनी वेळोवेळी त्या अफवांचं खंडन केलं आहे.
दुसरीकडे, करिश्मा कपूरने 2003 मध्ये उद्योजक संजय कपूरशी लग्न केलं. मात्र 2013 मध्ये त्यांचं विभक्त होणं ठरलं. अलीकडेच करिश्माचे माजी पती संजय कपूर यांचं इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अभिषेक आणि करिश्मा यांचं नातं प्रेमाने सुरू झालं, पण अनेक कौटुंबिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे ते टिकू शकलं नाही. त्यांच्या प्रेमकथेने अनेकांच्या मनात घर केलं होतं, पण त्या नात्याचा शेवट दुःखदच झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला', महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं गाणं कोणाचं आहे?
1995 साली रिलीज झालेला सिनेमा आजही थिएटरमध्ये गाजतोय, किती कोटींची केली होती कमाई?





















