'हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला', महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं गाणं कोणाचं आहे?
Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song : 'हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला', महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं गाणं कोणाचं आहे? जाणून घेऊयात..

Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song : महाराष्ट्रात हुंडा प्रथा अनेक मुलींच्या जीवावर बेतलीये. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तालुका पातळीवरच्या नेतेमंडळींच्या घरी देखील ही प्रथा अस्तित्वात असल्याचं समोर आलं. महाराष्ट्रात हुंडा प्रथेविरोधात राज्यभरातील नेतेमंडळींनी कारवाई करण्याचा आग्रह धरणार असल्याचं बोलून दाखवलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी मी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही म्हटलं होतं. (Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song)
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मुलांनी मामाच्या मुलीसोबत विवाह केल्याचं तुम्ही पाहिलं असेल.. ग्रामीण महाराष्ट्रात जणू सर्रास घडलेलं पाहायला मिळतं. काही वर्षांपूर्वी अशा लग्नाचं प्रमाणही जास्त होतं. त्याचवेळी मामाची मुलगी आणि हुंडा प्रथा यावर भाष्य करणारं एक गाणं महाराष्ट्रात आलं आणि तुफान व्हायरल झालं. 'हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला', असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हे गाणं हुंडा प्रथेवर उपरोधितपणे भाष्य करतं. (Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song)
कोणाचं आहे हे गाणं?
हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला हे गाणं गायक Vijay Sartape यांचं आहे. Ultra Music Marathi या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रेक्षकांना पाहाण्यासाठी उपलब्ध आहे. ही गाणं Visual स्वरुपातही पाहाण्यासाठी शूट करण्यात आलं होतं.
“हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला” (Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song) हे गाणं गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय झालेलं गाणं आहे. पहिल्या ऐकणीत खुसखुशीत आणि विनोदी वाटणारं हे गाणं, प्रत्यक्षात एका गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारं आहे. हुंडा म्हणजेच मुलीकडून मुलाच्या कुटुंबाला लग्नात दिला जाणारा पैसा, वस्तू किंवा मालमत्ता – ही एक जुनी परंपरा असून आजही अनेक ठिकाणी ही प्रथा पाळली जाते. समाजात या प्रथेमुळे मुलींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठा अन्याय होतो. हे गाणं या अन्यायाविरुद्ध सामान्य जनतेच्या मनात असलेला रोष आणि भावनांचा आवाज ठरतं. (Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song)
गावाकडील लग्नसराई, जत्रा, तमाशा, कीर्तन, लोकनाट्य अशा ठिकाणी हे गाणं गायलं जातं. आजच्या काळात सोशल मीडियाच्या साहाय्याने हे गाणं तरुण पिढीपर्यंत पोहोचलं आणि त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स, व्हाट्सअप स्टेटस यांमधून हे गाणं सतत ऐकायला मिळतं. काही कलाकारांनी त्याचे रिमिक्स व्हर्जन्स तयार केले असून, गाण्याचं सादरीकरण आणखी आधुनिक पद्धतीनं केलं जात आहे. (Hunda Nako Mama Fakta Poragi Dya Song)
इतर महत्त्वाच्या बातम्या
1995 साली रिलीज झालेला सिनेमा आजही थिएटरमध्ये गाजतोय, किती कोटींची केली होती कमाई?


















