Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Dimple Kapadia On Nana Patekar: एका जुन्या मुलाखतीत बोलताना डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांसोबतचा काम करण्याचा अनुभव सांगितलेला. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकरांच्या स्वभावाच्या दोन्ही बाजू स्पष्ट केल्या.

Dimple Kapadia On Nana Patekar: नव्वदच्या दशकात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अनेक जोड्यांची चर्चा व्हायची, त्यातली एक म्हणजे, नाना पाटेकर (Nana Patekar) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची सुपरहिट ठरलेली जोडी. नाना आणि डिंपल यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. त्यापैकी त्यांचे प्रहार (1991), अंगार (1992), क्रांतिवीर (1994) सिनेमे विशेष गाजले. दोघांमध्ये उत्तम मैत्री होती. असं असूनही एका जुन्या मुलाखतीत बोलताना डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केलेलं.
'प्रहार: द फायनल अटॅक' (Prahaar: The Final Attack), 'अंगार' (Angaar) आणि 'क्रांतिवीर' (Krantiveer) या सिनेमांमध्ये डिंपल कपाडिया (Actress Dimple Kapadia) आणि नाना पाटेकर (Actor Nana Patekar) एकत्र झळकलेले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी दोघांनी 'तुम मिलो तो सही' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केलेली. त्यानंतर आता दोघे 'वेलकम 2'मध्ये एकत्र दिसलेत. एका जुन्या मुलाखतीत बोलताना डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांसोबतचा काम करण्याचा अनुभव सांगितलेला. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकरांच्या स्वभावाच्या दोन्ही बाजू स्पष्ट केल्यात.
बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया नाना पाटेकरांबाबत काय म्हणाल्या? (Dimple Kapadia On Nana Patekar)
NDTV ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना डिंपल कपाडिया यांना नाना पाटेकरांबाबत प्रश्न विचारण्यात आला. नाना पाटेकरांबरोबर बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याचा अनुभव कसा होता? या प्रश्नावर बोलताना डिंपल कपाडिया यांनी दिलेलं उत्तर भुवया उंचावणारं होतं. "मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... ", असं डिंपल कपाडिया म्हणाल्या. पण, त्यासोबतच पुढे बोलताना डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांबाबतच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या.
मला नानांचा अभिनय खूप आवडतो, त्यासाठी मी जीवही देऊ शकते : डिंपल कपाडिया
अभिनेते नाना पाटकेरांबाबत बोलताना डिंपल कपाडिया म्हणाल्या की, "चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूनं... खरं तर ते खूप प्रतिभावान आहेत, यात तिळमात्र शंका नाही... त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही मी चुका माफ करू शकते... मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की, त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते...", असं वक्तव्य डिंपल कपाडिया यांनी केलंय.
डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकरांच्या त्यांना वाटणाऱ्या वाईट बाजूबाबतही सांगितलं. त्या म्हणाल्या की, "एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागतात, आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची वाईट बाजूही पाहिलीय, त्यांच्या नकारात्मक बाजू प्रमाणेच आपल्या सर्वांचीही अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लवपून ठेवतो... तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीनं लपवून ठेवलीय..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















