Aai Kuthe Kay Karte : संजना करणार आत्महत्येचा प्रयत्न! देशमुख कुटुंबाच्या अडचणी वाढणार?
Aai Kuthe Kay Karte : त्वेषाने पेटून उठलेली संजना आता देशमुख कुटुंब आणि अनिरुद्धला धडा शिकवण्याचा चंग बांधते. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी आहे.
Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आता तिच्या स्वप्नांचा मागोवा घेत पुढे जात आहे. तर, दुसरीकडे देशमुखांच्या घरात मात्र नुसता गोंधळ माजला आहे. आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे. अनिरुद्धचा घटस्फोटाचा निर्णय ऐकून संजना चांगलीच संतापली आहे.
राग आणि त्वेषाने पेटून उठलेली संजना आता देशमुख कुटुंब आणि अनिरुद्धला धडा शिकवण्याचा चंग बांधते. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी आहे. यावेळी ती घटस्फोट मागणाऱ्या अनिरुद्धला आत्महत्या करण्याची धमकी देते. मात्र, संजना नेहमीप्रमाणे केवळ धमकी देतेय असे वाटल्याने कुणीच तिच्याकडे लक्ष देत नाही. मात्र, यावेळी संजनाने तिचे म्हणणे खरे केले आहे. संजनाने झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
घटस्फोटाला कारण ठरलं...
अप्पांनी अरुंधतीच्या नावावर घराचा अर्धा हिस्सा केला होता. मात्र, संजनाने तिच्याकडून तो हिसकावून घेतला. दुसरीकडे कामाचे कागद सांगून तिने घरच्या कागदांवर अनिरुद्धची सही घेतली आणि संपूर्ण समृद्धी बंगला तिने आपल्या नावावर करून घेतला होता. तिचा हाच खोटेपणा सगळ्यांसमोर आला. संजनाने सगळ्यांची फसवणूक करून घर नावावर करून घेतल्याचं कळताच देशमुख कुटुंब संतापलं. संजनाचा हा कारनामा समोर येताच अनिरुद्ध देखील संतापला. त्याने रागाच्या भरात, घर परत कर, नाहीतर तुला घटस्फोट देईन, अशी धमकी संजनाला दिली होती. या धमकीला घाबरून तिने घर तर परत केलं.
मात्र, अनिरुद्ध त्याच्या निर्णयावर ठाम राहीला आहे. तो सतत संजनाला घटस्फोट देण्याची धमकी देत आहे. याच धमकीच्या दबावाखाली आता संजनाने टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वतःला इजा करून ती सगळा दोष देशमुख कुटुंबावर टाकणार आहे. मात्र, या सगळ्यात आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...
PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!