Vinod Tawde VIDEO : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? बिहारच्या मुख्यमंत्रिपदी कोण? बिहार विजयाचे मराठी 'शिल्पकार' विनोद तावडेंनी पत्ते खोलले
Vinod Tawde On Bihar Election Result 2025 : 243 जागी भाजपचा उमेदवार उभा आहे या भावनेतून आम्ही काम केलं, त्यामुळे बिहारमध्ये घवघवीत यश मिळाल्याची प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.

पाटणा : महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्येही विरोधकांचे पानिपत झालं असून भाजप प्रणित एनडीएने जवळपास 208 जागांवर यश मिळवल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनता दलच्या कार्यकर्त्यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावाचा जप सुरू केला असला तरी भाजपकडून मात्र वेगळी प्रतिक्रिया येत आहे. बिहारच्या यशाचे शिल्पकार समजल्या जाणाऱ्या विनोद तावडेंनी (Vinod Tawde) मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं भाष्ट केलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत एनडीएतील पाचही पक्ष एकत्र बसतील आणि चर्चा करतील असं तावडे म्हणाले. तसेच हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जाईल असंही ते म्हणाले.
बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर भाजपचे महासचिव आणि भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. एनडीएतील सर्व पक्षांची बैठक होईल आणि त्यावर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल असं ते म्हणाले.
Bihar Election Result 2025 : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा का जाहीर नाही?
बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा का जाहीर केला नाही या प्रश्नावर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रमध्येही आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. हा विरोधकांचा डाव होता. एका बाजूला नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि आजारी माणसाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला असा प्रचार करण्याचा डाव विरोधकांचा होता. अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आधीच स्पष्ट केलं होतं. एनडीएमध्ये मुख्यमंत्रिपदाची कोणतीही व्हॅकन्सी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचं नाव घोषित करण्याची गरज नव्हती.
Vinod Tawde On Bihar : एकत्र आल्याने चित्र बदललं
भाजप छोटे पक्ष संपवतो असा आरोप केला जातो हे खोटं आहे. आमच्या ज्या ज्या राज्यांमध्ये आघाड्या झाल्या आहेत त्याठिकाणी सर्व काही चांगलं सुरू आहे. बिहारमध्ये भाजपची एकट्याची ताकद नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण सगळे एकत्र आलो तर बिहारचं चित्र बदलू शकतो असा आम्हाला विश्वास होता. त्यामुळेच आम्ही जातीरुपी कौरवांचा पराभव करू शकलो असं विनोद तावडे म्हणाले.
आम्ही 243 उमेदवार हे भाजपचेच असल्याचं मानलो आणि कार्यकर्त्यांनी त्यासाठी काम केलं. त्याचाच परिणाम म्हणून लोकांनी एनडीएच्या सर्वच पक्षांना मतदान केलं. बिहारमध्ये अडीच वर्षे काम केलं, त्याचं आज चीज झालं त्याचं समाधान वाटतंय. दिलेलं काम नीटपणे पार पाडणे हेच भाजपच्या कार्यकर्त्यांचं काम आहे अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली.
'रफ्तार पकड चुका है बिहार' ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीला सामोरं गेलो. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये विकास झाला. त्यालाच मतदारांनी पसंती दिली असंही विनोद तावडे यांनी सांगितलं.
NDA Won Bihar Election : बिहारमध्ये यश कसं मिळवलं?
एनडीएमधील घटक पक्षात प्रामाणिक संवाद ठेवला, विश्वास दिला. एखादा मुद्दा पटला नाही तर त्यावर चर्चा करुन मार्ग काढला. लोकसभेला तसा आम्ही संवाद ठेवला, आता विधानसभेलाही तीच भूमिका घेतल्याने हे यश मिळाल्याचं विनोद तावडे म्हणाले.
ही बातमी वाचा:


















