एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : 'ये मत हमें दे दे ठाकूर!'; मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याकडं नेत्यांची गर्दी

Vidhan Parishad Election 2022: संख्याबळ वाढवण्यासाठी अवघे 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या घराचा उंबरा अक्षरशः झिजलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Vidhan Parishad Election 2022:  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.  या निवडणुकीत एक- एक मत महत्वाचं आहे. हेच संख्याबळ वाढवण्यासाठी अवघे 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या घराचा उंबरा अक्षरशः झिजलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राज्यसभेत जवळपास अर्धा डझन नेत्यांनी भेटी घेतल्यानंतर आता या ठाकुरांच्या घरी जात गेल्या तीन दिवसात चार नेत्यांनी भेटी घेतल्यात. त्यामुळे 'ये हात नहीं पर हात से वोट  हम को देदे ठाकूर' म्हणणाऱ्या कोणत्या नेत्यांच्या पदरात ठाकूर मतं टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

सध्या वसईतल्या हितेंद्र ठाकूर यांच्या घरी आमदारांची येजा वाढलेली आहे. आधी राज्यसभेसाठी आणि आता विधान परिषदेसाठी त्यांच्या पक्षात असलेली तीन मतं मिळवण्यासाठी प्रत्येक जण ठाकूर यांना साकडं घालतोय. सगळ्यात आधी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप ठाकूर यांच्या भेटीला आहे. त्यांचा अविर्भाव असा होता की आपण मत बित माग मागायला आलोच नव्हतो. 
  
काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकरही आले. नंतर भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड आणि नंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे देखील ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले.  प्रत्येकाला मत हवंय. हे उघड आहे. पण सगळेच 'मी नाही त्यातला' याच अविर्भावात होते.  

हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत. ते जितके पवारांच्या जवळचे आहेत. तितकेच ठाकरे आणि राऊतांच्याही जवळ आहेत आणि तितकेच भाजपच्याही. आणि त्यामुळे त्यांचं मत कुणाकडे जाणार? हे पाहावं लागेल. वसईचे ठाकूर हे सध्या उमेदवारांच्या लेखी सुपरहिरो पेक्षा कमी नाहीत. 

हे देखील नक्की वाचा

Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 19 November 2024Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतंKshitij Thakur PC| राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
Embed widget