अमित ठाकरेंना काकांकडून खरंच छुपी मदत? उद्धव ठाकरेंकडून एक घाव दोन तुकडे; थेट सांगूनच टाकलं!
सध्या माहीम हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या जगेवर अमित ठाकरे मनसेच्या तिकिटावर उभे आहेत. त्यामुळे येथे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माहीम हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या जागेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे उभे आहेत. या जागेवर तिहेरी लढत होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील या जागेवर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे. मात्र 18 नोव्हेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची माहीम मतदारसंघात सभा नाहीये. त्यामुळेच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरेंकडून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) छुपा पाठिंबा दिला जातोय का? असे विचारले जात होते. आता यावरच आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेचा आज वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना माहीम मतदारसंघाबद्दल विचारण्यात आलं. यावर बोलताना "माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा मतदारसंघ माझा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तसं पाहायचं झालं तर मुंबईत काल एक सभा झाली. 17 तारखेलाही सभा आहे. मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
...असा त्याचा अर्थ होत नाही
तसेच, "माझा मुंबईकरांवर विश्वास आहे. मुंबईकरांचाही माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहे. एकीकडे गेलो आणि एकीकडे गेलो नाही, म्हणजे मी एका बाजूने लक्ष देतोय आणि दुसरीकडे दुर्लक्ष करतोय, असा त्याचा अर्थ होत नाही," असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं.
...असं मला वाटत नाही
"आता दिवसाला चार-चार, पाच-पाच सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ पूर्ण होऊ शकत नाहीयेत. मधला प्रवासाचा काळा आणि दिवासाची उन्हाची वेळ पाहून दिवसाला चार पेक्षा जास्त सभा होतील, असं मला वाटत नाही," असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
माहीम जागेवर तिहेरी निवडणूक
दरम्यान, माहीम या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. मनसेतर्फे अमित ठाकरे हे उभे आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट देण्यात आलंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवरून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray Video News :
हेही वाचा :