एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tripura Election: 60 जागा, 259 उमेदवार अन् 28 लाख मतदार; त्रिपुरा विधानसभेसाठी आज मतदान

Tripura Assembly Election Voting: त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार असून मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे. 2018 च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आली होती.

Tripura Assembly Election Voting: त्रिपुरातील निवडणुकीची (Tripura Assembly Election 2023) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितलं की, गुरुवारी 60 सदस्यीय त्रिपुरा (Tripura) विधानसभेसाठी मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात 3,337 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असल्याचंही यावेळी माहिती देताना दिनकरो यांनी सांगितलं. यापैकी 1,100 मतदान केंद्रे संवेदनशील आणि 28 अतिसंवेदनशील आहेत.

भाजप आयपीएफटीसोबत युती करुन या निवडणुका लढवत आहे. त्यामुळे सीपीआय (एम) काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे. याशिवाय माजी राजघराण्याचे वंशज प्रद्योत बिक्रम यांचा टिपरा मोथा हा पक्षही निवडणूक लढवत आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीही या निवडणुकांमध्ये काही जागांवर निवडणूक लढवत आहे. राज्यातील विधानसभेच्या 60 जागांसाठी एकूण 259 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्रिपुरा विधानसभेसाठी आज मतदान पार पडणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

'या' पक्षांकडून अनेक उमेदवार रिंगणात 

या निवडणुकांमध्ये भाजपने आयपीएफटीच्या सहकार्याने निवडणूक लढवली आहे. भाजप 55 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटी 5 जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय काँग्रेस-डाव्यांमधील जागांच्या करारानुसार, डावी आघाडी 43 जागांवर तर काँग्रेस 13 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय एका जागेवर काँग्रेस आणि डाव्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याशिवाय प्रद्योत बिक्रम यांच्या टिपरा मोथा या नव्या पक्षाने राज्यातील 60 पैकी 42 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी राज्यात केवळ 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय 58 उमेदवार अपक्ष असून इतर पक्षांचेही काही उमेदवार रिंगणात आहेत. 

सुरक्षा व्यवस्था कडक

मतदान मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने 31,000 मतदान कर्मचारी आणि केंद्रीय दलाचे 25,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलिसांचे 31,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात आधीच प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory Order)  लागू करण्यात आले आहेत आणि ते 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. तसेच, राज्याच्या आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय सीमाही सील करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत 13.53 लाख महिलांसह एकूण 28.13 लाख मतदार 259 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

'या' उमेदवारांवर सर्वांच्या नजरा 

मुख्यमंत्री माणिक साहा हे टाऊन बारडोवली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत, तर केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक धानपूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर डावे-काँग्रेस आघाडीचा चेहरा असलेले सीपीआयएमचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी हे सबरूम विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, पूर्वोत्तर राज्यातील माजी राजघराण्याचे वंशज आणि टिपरा मोथाचे संस्थापक प्रद्योत देबबर्मा हे रिंगणात नाहीत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget