एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शिरपूर विधानसभा | काँग्रेस आमदार काशीराम पावरा हॅट्रिक करणार की भाजप परिवर्तन घडवणार?

शिरपूर भरपूर असं जरी उपरोधिकपणे म्हटलं जात असलं तरी तशी परिस्थिती शिरपूरमध्ये आहे का? हा प्रश्न स्थानिकांना विचारला तर ते सांगतात की अशी परिस्थिती बिलकूल नाही.

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा विधानसभा मतदार संघ 2009 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र 2009 पासून हा मतदारसंघ राखीव झाला. शिरपूर भरपूर असं जरी उपरोधिकपणे म्हटलं जात असलं तरी तशी परिस्थिती शिरपूरमध्ये आहे का? हा प्रश्न स्थानिकांना विचारला तर ते सांगतात की अशी परिस्थिती बिलकूल नाही. शिरपूर विधानसभा मतदारसंघात साधारण 140 गावांचा समावेश आहे. जलसंवर्धन पॅटर्न म्हणून शिरपूरचं नाव आजदेखील सर्वदूर परीचित आहे. शिरपूर शहर तालुक्यात काँग्रेसचे अमरीश पटेल यांचं वर्चस्व आहे. शिरपूर नगर पालिकेसह तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर अमरीश पटेल यांच्या गटाचं वर्चस्व आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघ 2009 पासून जरी राखीव असला तरी आजपर्यंत अमरीश पटेल यांचं त्यावर वर्चस्व कायम आहे. 2009 ते आजपर्यंत काँग्रेसचे काशीराम पावरा हे या मतदार संघाचे आमदार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आई - वडिलांचे शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी काही काळ वास्तव्य होते, असे ग्रामस्थ सांगतात. तर शिरपूर हे दिवंगत सिनेअभिनेत्री स्मिता पाटील यांचं जन्मठिकाण आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार या लोकसभा मतदार संघात येतो. यंदाच्या निवडणुकीत या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आपला झेंडा फडकवतो की काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा हॅट्रिक करतात? याबाबत मतदारांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे . काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गेली नऊ वर्ष भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून, समाजकार्याच्या माध्यमातून खिंड लढवत आहेत. संवाद यात्रेच्या माध्यमातून सध्या डॉ. जितेंद्र ठाकूर हे गावागावात जाऊन नागरिक, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉ. ठाकूर यांनी शिरपूर विधानसभा मतदार संघातील जवळपास पावणेतीन लाख लोकांचा अपघाती विमा उतरवला आहे. आतापर्यंत 10 जणांना प्रत्येकी 25 हजारांची मदतदेखील मिळाली आहे. काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा सुळे या गावचे आहेत. परंतु त्यांच्याच गावात समस्यांचा पाढा असल्याचे विरोधक सांगतात. शिरपूर तालुक्यातील किमान 30 ते 40 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या साखर कारखान्यामुळे सुरु होता असा शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील साखर कारखाना गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. सूत गिरणीचीदेखील बिकट अवस्था आहे. 2014 च्या शिरपूर विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मतं काशीराम पावरा ( काँग्रेस ) - 98 हजार 114 ( विजयी ) डॉ . जितेंद्र ठाकूर ( भाजप ) - 72 हजार 913 जयवंत पाडवी - ( राष्ट्रवादी ) - 11 हजार 409 गुलाब मालचे ( कम्युनिस्ट ) - 5 हजार 547 रणजित भरतसिंग पवार ऊर्फ पावरा ( शिवसेना ) - 3 हजार 942 शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या पुरुष मतदार :- 1 लाख 53 हजार 282 स्त्री मतदार :- 1 लाख 59 हजार 295 एकूण मतदार :- 3 लाख 12 हजार 577 लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतं नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसला 76 हजार 682 मतं मिळाली. तर भाजपला 1 लाख 17 हजार 388 मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 40 हजार 706 मताधिक्क्य मिळाले होते. यावरून विधानसभा निवडणुकीतदेखील या मतदार संघात भाजपचाच झेंडा फडकेल, परिवर्तन होईल असा भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं मताधिक्क्य काँग्रेसच्या गोटात चिंतेचा विषय ठरला आहे. शिरपूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार शिरपूर विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार काशीराम पावरा, तर भाजपच्या वतीनं डॉ. जितेंद्र ठाकूर हे इच्छुक आहेत. यंदा शिरपूरमधून वंचित बहुजन आघाडीदेखील या मतदार संघात नशीब आजमावण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यासाठी उमेदवाराचं नांव जाहीर झालं नाही. विद्यमान आमदार काशीराम पावरा यांच्यासाठी असलेल्या जमेच्या बाजू शिरपूर तालुका हा मध्य प्रदेश राज्याला लागून असल्याने या तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असतात. बनावट मद्य, स्पिरिटचा काळाबाजार यामुळे शिरपूर तालुका बदनाम होऊ नये, म्हणून स्वतः आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात काँग्रेसचे तालुक्याचे जेष्ठ नेते अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधलं होतं. आदिवासींच्या प्रश्नांसंदर्भातदेखील काशीराम पावरा यांनी स्वतःच्या नेतृत्वात काढलेला शिरपूरमधील मोर्चा लोक विसरलेले नाहीत. अमरीश पटेल यांचे खंदे समर्थक, विश्वासू म्हणून ओळख या आमदार काशीराम पावरा यांच्या जमेच्या बाजू म्हणता येतील. मात्र लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आणि भाजपला मिळालेली मतं पाहता तसेच शिरपूर तालुक्यातील युवकांचा कल पाहता यंदाची शिरपूर विधानसभा निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Embed widget