एक्स्प्लोर
Advertisement
कोपरी पाचपाखाडी विधानसभा | शिवसेनेचा बालेकिल्ला सर करण्याचे कॉंग्रेसपुढे मोठे आव्हान
अजूनही शिवसेनेचे पारंपरिक मतदार अजूनही इथे आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहणायसाठी एकही मोठा नेता नसल्याने लोकांना चांगला पर्याय देखील नाही. म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे इथून निवडून जाण्याची शक्यता आहे.
ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखाडी. ठाणे शहरात हा मतदार संघ येतो. कित्येक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा विभाग ओळखला जातो.
असा आहे हा मतदारसंघ
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत हा मतदारसंघ मोडतो जिथे शिवसेनेचीच सत्ता आहे. ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील भाग, कोपरी गाव, आनंद नगर हा भाग यात मोडतो तर ठाणे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागात लुईस वाडी, हाजूरी, रामचंद्र नगर, राम नगर, ज्ञानेश्वर नगर, किसान नगर एक ते चार आणि वागळे इस्टेटचा संपूर्ण भाग याच मतदार संघात येतो.
इतिहास काय सांगतो
ठाणे शहर हा मतदारसंघ अतिशय मोठा होता. 2004 साली एकनाथ शिंदे हे याठिकाणी निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी ठाणे शहर मतदारसंघातून कोपरी पाचपाखाडी वेगळा झाला. तेव्हा पासून एकनाथ शिंदे यांनाच इथे शिवसेनेतर्फे तिकीट देण्यात येते. 2014 ला मोदी लाट असताना सर्वपक्ष युती आघाडी न करता लढत असताना देखील एकनाथ शिंदे एक लाख मतांनी इथून निवडून आले होते.
हे ही वाचा -वरळी विधानसभा मतदारसंघ | आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे; उमेदवारी कोणाला?
काय आहे सद्यस्थिती
2009 च्या आधीपासूनच जेव्हा, ठाणे शहर या मतदारसंघात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ यायचा, तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावावर भावनिक मतदान इथे होते. यावेळी देखील लोकसभेला या गोष्टींचा प्रभाव दिसून आला. त्याचसोबत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी राजकीय विरोधकच शिल्लक ठेवले नाहीयेत. या मतदारसंघात सध्यातरी आघाडीकडून लढण्यासाठी स्थानिक मोठा नेता नाही. त्यामुळे युती झालेली असताना युतीकडून एकनाथ शिंदे यांना तिकीट दिले जाईल. पण आघाडीकडून कोण असा प्रश्न आहे. तरीही काँग्रेसकडून शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांना तिकीट मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र महापालिका निवडणुकीतच त्यांचा दारुण पराभव झाला असल्याने विधानसभा निवडणुकीत ते काय टिकाव धरणार याबाबत आतापासूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण, मिलिंद खराडे, शैलेश शिंदे आदींसह तब्बल 10 जण इथून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीने मात्र हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याने चिंता नाही. तरीही जर युती तुटली तर भाजपकडून शहर अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण हे इथून इच्छुक आहेत.
हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार
इथे असलेल्या समस्या
एकनाथ शिंदे जरी राज्यातील मोठे नेते असले तरी इथे गेल्या पाच वर्षात एकही मोठा प्रकल्प झालेला नाही. अनेक जुन्या, धोकादायक आणि अनधिकृत इमारती इथे आहेत. मात्र क्लस्टर डेव्हलपमेंट इथे अजूनही सुरु झालेले नाही. गेली अनेक वर्षे इथले नागरिक या योजनेची वाट बघत आहेत. इथे असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सॅटिस दोन हा प्रकल्प इथे राबवला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन देखील झाले आहे मात्र कामाला अजून सुरुवात झालेली नाही. तर वागले इस्टेट सारखील सर्वात मोठी असलेली औद्योगिक वसाहत जवळ जवळ संपुष्टात आली आहे. अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या विभागातून बंद झाल्या आहेत.
2019 च्या निवडणुकीत शक्यता
2019 च्या लोकसभेचा विचार केल्यास शिवसेनेचे राजन विचारे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे अजूनही शिवसेनेचे पारंपरिक मतदार अजूनही इथे आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहणायसाठी एकही मोठा नेता नसल्याने लोकांना चांगला पर्याय देखील नाही. म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे इथून निवडून जाण्याची शक्यता आहे.
एकूण मतदार - 341604
पुरुष 188165
स्त्रिया 152968
एकूण मतदान केंद्रे 368
2014 चा निकाल ( पहिले तीन )
एकनाथ शिंदे ( शिवसेना ) 1,00,016
संदीप लेले ( भाजपा ) 48,447
मोहन तिवारी ( काँग्रेस ) 17,873
विजयी - एकनाथ शिंदे - 51,869 चे मताधिक्य
- जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement