एक्स्प्लोर

ठाणे शहर मतदारसंघ : शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे तर आला, आता काय होईल?

ठाणे जिल्हा हा मुंबईपेक्षा भक्कम असा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण 2014 च्या निवडणुका सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या लढल्या आणि ठाणे शहर हा मतदारसंघ भाजपकडे आला. आता निवडणूक कोण जिंकतं यापेक्षा जागावाटपात ठाणे शहर मतदारसंघ कुणाकडे यातो, याचीच सर्वाधिक उत्सुकता आहे..

ठाणे शहर हा मतदार संघ संपूर्ण ठाण्याचं हृदय मानला जातो. या मतदारसंघात ठाण्याला लाभलेले आजपर्यंतचे सर्व मोठे नेते आमदार होऊन गेलेत. या मतदारसंघाला मोठा इतिहास आहे. सोबत कट्टर शिवसैनिकांचे पाठबळ आहे. मात्र शिवसेनेचा हाच बालेकिल्ला गेल्या निवडणुकीत भाजपने स्वतःकडे खेचून घेतला.
ठाणे शहर मतदार संघाचा इतिहास
असं म्हणतात की मुंबईपेक्षा ठाणे हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांनी जन्माला घातलेल्या शिवसेनेचा ठाण्यातील प्रचार आणि प्रसार आनंद दिघे यांनी केला. अगदी 90 च्या दशकापासून इथे शिवसेनेचे आमदार आहेत. मो दा जोशी 1990 साली पाहिल्यांना शिवसेनेचे आमदार म्हणून इथे निवडून आले. त्याआधी काँग्रेसची सत्ता इथे होती. पण 90 नंतर 2014 पर्यंत इथे केवळ आणि केवळ शिवसेनाच उमेदवार निवडून आला आहे. मो दा जोशी यांच्यानंतर आताचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्वेसर्वा एकनाथ शिंदे 2004 ला इथून पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर गेले. 2009 ला मात्र या मतदारसंघाचं विभाजन झालं आणि केवळ जुनं ठाणे या मतदारसंघात ठेवलं गेलं. तेव्हा पण सेनेचे राजन विचारे या मतदारसंघातून विधानसभेवर गेले. 2014 ला मात्र अनपेक्षितपणे ही सीट भाजपकडे गेली.
असा आहे हा मतदारसंघ
148 ठाणे शहर मतदारसंघात ठाणे स्टेशनच्या पश्चिमेकडील भाग येतो. जुनं ठाणे याच मतदारसंघात आहे. ठाण्याची प्रमुख ओळख असलेले भाग इथेच आहेत. ठाणे मुख्य मार्केट, नौपाडा, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, टेंभी नाका, ठाणे जेल, कोपनेश्वर मंदिर ही सर्व ठिकाणं इथेच आहेत.
मतदार संघाचा विस्तार...
पांचपाखाडी, चंदनवाडी, भक्ती मंदिर, नौपाडा, विष्णू नगर, गोखले रोड, गावदेवी, हंस नगर, खोपट, कोलबाड, उथळसर, गोकुळ नगर, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस लाईन जरी मरी, खारकर अळी, खारटन रोड, महागिरी, तलावपाळी, ढोकाळी, मानपाडा, खेवरा सर्कल, बाळकुम, मनोरमा नगर, ब्रम्हांड, गांधी नगर, धर्मवीर नगर, वसंत विहार, वृंदावन, राबोडी १, राबोडी २ यासोबत या भागात असलेली मुख्यतः ब्राम्हण समाजाची लोकसंख्या उल्लेखनीय आहे. या मतदारसंघात श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकसंख्या खूप आहे. ही लोकसंख्या मतदानावर प्रभाव टाकते. तर राबोडी सारख्या विभागात मुस्लिम मतदारही आहेत.
सध्याची राजकीय स्थिती
2014 साली सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. ठाण्यात तर शिवसेना निश्चित होती. कारण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना दैवत समजणाऱ्या मतदारांचा हा मतदारसंघ! पण झालं उलटंच. निवडणुकांचे निकाल लागले आणि लोकांनी शिवसेनेऐवजी भाजपला पसंती दिली. आणि पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला. 2014 ला शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा भाजपच्या संजय केळकर यांनी पराभव केला आणि ठाण्यात सेनेला धक्का बसला. तब्बल साडे बारा हजार मतांनी केळकर जिंकले होते. सेनेचा गड भाजपकडे गेल्याने भाजपच्या गोटात आनंद मावेनासा झालेला तर शिवसेना चिंतातूर झाली. रवींद्र फाटक यांच्या सोबत, राष्ट्रवादीकडून उभे असलेले निरंजन डावखरे आणि काँग्रेसकडून उभे असलेले नारायण पवार, दोघांनाही हार पत्करावी लागली होती. त्याहून धक्कादायक म्हणजे हे दोन्ही उमेदवार आता भाजपमध्ये आहेत. म्हणजे यावर्षी उमेदवार कोणता द्यायचा असा प्रश्नच आघाडीला पडलाय. 2014 नंतर दोन वर्षांनी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत देखील या ठिकाणी शिवसेनेपेक्षा भाजपचे नगरसेवक जास्त संख्येने निवडून आले. म्हणून आता सेनेच्या या भक्कम गडात भाजपने मतदारांना आकर्षित केलंय असंच म्हणावं लागेल.
2019 मध्ये अजूनतरी युती असल्याने शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत. पण या मतदारसंघावर नक्की कोण दावा ठोकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असला तरी 2014 पासून भाजपने वर्चस्व वाढवलंय. त्यामुळे वाटाघाटीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर भाजपकडेच ही सीट दिली तर संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. आणि शिवसेनेकडे जर सीट गेली तर आताचे पालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजप कडून संदीप लेले यांचे नाव देखील चर्चेत आहे. मात्र  युती तुटली तर हेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात देखील लढू शकतात. त्यामुळे सर्व काही येणाऱ्या काळावर अवलंबून आहे.
दुसरीकडे आघाडीमध्ये अजून काहीही स्पष्ट दिसत नाही. गेल्यावेळेचे दोन्ही उमेदवार आता भाजपमध्ये गेलेले असल्याने नवीन चेहऱ्यांना इथे संधी मिळेल अशी शक्यता आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी काही महिन्यांपासून ठाणे शहर मतदार संघात तयारी सुरु केलीय. त्यांना काँगेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सोबत काँग्रेसकडून सचिन शिंदे यांना देखील पसंती दिली जाऊ शकते. यात एक शक्यता अशी देखील आहे की मनसे आणि वंचित आघाडी सोबत येतील. असं झालं तर ठाणे शहर मतदारसंघ हा मनसेच्या वाट्याला जाऊन अविनाश जाधव यांना उमेदवारी मिळणार हे जवळ जवळ निश्चित आहे. पण जर आघाडी झालीच नाही तर काँग्रेस आणि मनसेच्या याच उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी आनंद परांजपे यांना उमेदवारी देऊन ब्राम्हण कार्ड चालवू शकते.
ठाणे शहर मतदार संघातील समस्या
या मतदार संघात काही समस्या देखील आहेत. इथे असलेल्या दाट लोकसंख्येच्या मानाने इथले रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. उच्चभ्रू लोकांच्या या वस्तीत गाड्यांच्या पार्किंगसाठी देखील जागा उपलब्ध नाही. प्रत्येक पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. सोबत अतिक्रमणाचा मुद्दा देखील महत्वाचा आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न देखील महत्वाचा आहे.
२०१९ ची शक्यता
एकूणच २०१४ पासूनची शक्यता पाहता इथे भाजपचा उमेदवार निवडून येईल अशी शक्यता मोठी आहे. गेल्या ५ वर्षात निरंजन डावखरे आणि नारायण पवार यांच्यासारखे उमेदवार देखील भाजपने स्वतःकडे घेतल्याने नवीन चेहऱ्यांना संधी देण्याशिवाय आघाडीतील नेत्यांना पर्याय नाही.
२०१४ चा निकाल संजय केळकर - भाजप - ७०,८८४ रवींद्र फाटक - शिवसेना - ५८,२९६ निरंजन डावखरे - राष्ट्रवादी - २४,३२०
विजयी - संजय केळकर - १२,५८८ चे मताधिक्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
×
Embed widget