एक्स्प्लोर

Telangana Election : तेलंगणाच्या निवडणुकीसाठी BRS पक्षाच्या 115 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री केसीआर दोन मतदारसंघातून लढणार

K Chandrasekhar Rao : मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे कामारेड्डी आणि गजवेल या दोन मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. 

BRS Candidates List 2023 : आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसने 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री केसीआर उर्फ के चंद्रशेखर राव हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. यापूर्वी फक्त भाजपने मध्य प्रदेशसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मुख्यमंत्री केसीआर कामारेड्डी आणि गजवेल या दोन मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र मंत्री कलवकुंतला तारका रामाराव (KTR) सिरिल्लामधून निवडणूक लढवणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी आगामी राज्य निवडणुकांसाठी 119 पैकी 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या आधी भाजपने त्यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. पण बीआरएसने जवळपास सर्वच जागांवर उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री केसीआर उर्फ के चंद्रशेखर राव हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री के. यादी जाहीर करताना चंद्रशेखर राव म्हणाले की, आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा 16 ऑक्टोबरला वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला पक्षातून हाकलून दिले जाईल.

बीआरएसला असा होणार फायदा 

बीआरएस पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. सर्वात आधी यादी जाहीर करण्यातून एक आत्मविश्वास मतदारापर्यंत पोहोचतो, तसंच उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो आणि निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यातून सुटका मिळते. निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून द्यायचा असतो. त्यामुळे आतापासून बीआरएसच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केल्यास किंवा खर्च केल्यास तो निवडणुकीच्या खर्चात दाखवणे बंधनकारक नाही. 

बीआरएसने निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच यादी जाहीर केली आहे. आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना BRS प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणाले की, आमची AIMIM सोबतची मैत्री कायम राहील.

या नेत्यांना तिकीट मिळालं

बीआरएसने जाहीर केलेल्या या यादीत सिरपूर येथील कोनेरू कोनप्पा, चेन्नूर (एससी) येथील बाल्का सुमन, बेल्लमपल्ली (एससी) येथील दुर्गम चिन्नैया, मंचेरील येथील नदीपेल्ली दिवाकर राव, आसिफाबाद (एसटी) येथील कोवा लक्ष्मी यांना तिकीट देण्यात आले आहे.

या यादीत खानापूर येथील भुक्या जॉन्सन राठोड नाईक, आदिलाबाद येथील जोगू रामण्णा, बोथा येथील अनिल जाधव, निर्मल येथील अल्लोला इंद्रकरण रेड्डी, माधोल येथील गड्डीगारी विठ्ठल रेड्डी, बांसवाडा येथील पोचाराम श्रीनिवास रेड्डी, बोधन येथील मोहम्मद शकील अमीर यांचा समावेश आहे. मैदानात उतरवले आहे.

याशिवाय जुक्कलमधून हणमंत शिंदे, येल्लारेड्डीमधून जजला सुरेंद्र, निजामाबाद अर्बनमधून बिगला गणेश गुप्ता, निजामाबाद ग्रामीणमधून गोवर्धन बाजीरेड्डी, बालकोंडामधून वेमुला प्रशांत रेड्डी यांना तिकीट देण्यात आले आहे.

तेलंगणात 16 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरमच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकांना लोकसभेची सेमी फायनल असंही म्हटलं जातं.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडेSanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोपRaksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget