एक्स्प्लोर

South Nagpur Vidhan Sabha : नागपूर दक्षिणच्या राजकीय महाभारतात काँग्रेसच्या गिरीश पांडवांचा पराभव; तर भाजपच्या मोहन मतेंनी भेदले लक्ष्य!   

South Nagpur Vidhan Sabha Constituency : नागपूरच्या 12 मतदारसंघापैकी दक्षिण नागपूर मतदारसंघात यंदा 'काटे की टक्कर' बघायला मिळाली होती. मात्र यात भाजपच्या मोहन मते यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

South Nagpur Vidhan Sabha Election 2024 Result : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) च्या रणधुमाळीचे अंतिम निकाल आता हाती आले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बहुतांश ठिकाणी दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. तर महायुतीला (Mahayuti) यंदा अभूतपूर्व यश मिळाले आहे. 

अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह नागपूरच्या 12 मतदारसंघापैकी दक्षिण नागपूर मतदारसंघात (South Nagpur Vidhan Sabha Constituency) यंदा 'काटे की टक्कर' बघायला मिळाली आहे. कारण गेल्या 2019 च्या निवडणुकीत फक्त चार हजारांवर निकाल लागलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जुनेच सरदार लढाईच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते (Mohan Mate) यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा गिरीश पांडव (Girish Pandav) यांच्यावर विश्वास दाखविला होता. मात्र या चुरशीच्या लाढतीत भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. तर  गिरीश पांडव यांना पुन्हा एकदा पराभवाला समोर जावे लागले आहे.  

मैदान तेच, मोहरेही तेच, अन् निकालही तेच!

मोहन मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील उजवे हात समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू आहेत. त्यामुळे दक्षिणच्या राजकीय महाभारतात मते आणि पांडव यांच्यात काट्याची लढाई होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघावर भाजपचा दबदबा राहिला आहे.  मात्र 2014 मध्ये भाजपचे सुधाकर कोहळे जायंट किलर ठरले. त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सतीश चतुर्वेदी यांना तब्बल 43 हजार 214 मतांनी मात दिली. पण 2019 मध्ये भाजपने कोहळे यांचे तिकीट कापले आणि मोहन मते यांच्यावर विश्वास दाखविला. तर दुसरीकडे काँग्रेसने गिरीश पांडव यांना मैदानात उतरविले. त्यांना नाराज कोहळे समर्थकांची पडद्यामागून साथ मिळाली. प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, सतीश होले या आघाडीच्या नेत्यांच्या बंडखोरीनंतरही 'टफ' फाईट झाली. त्यामुळे मते हे फक्त 4013 मतांनी विजयी झाले. 

मविआ विरुद्ध महायुती, विजय कुणाच्या हाती? 

लोकसभा निवडणुकी 2024 च्या दक्षिण नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी यांना 29 हजार 712 मतांची आघाडी मिळाली. आता अखेरच्या क्षणी भाजपने मास्टर कार्ड खेळत सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपुरात उमेदवारी दिली आणि कोहळे समर्थकांची नाराजी शमविण्याचा प्रयत्न केला. आघाडीत शिवसेनेच्या कोट्यात जात असलेली जागा कायम राखण्यसाठी काँग्रेस नेत्यांनीही मुंबई-दिल्लीत झुंज दिली. शेवटी पुन्हा एकदा गिरीश पांडव यांनाच गेल्या वेळची उरलेली लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेससह मित्रपक्षातूनही कुणी बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असल्याचे चित्र आहे. 

तांडव होईल आणि पांडव विजयी होईल- गिरीश पांडव

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात यंदा तांडव होईल आणि पांडव विजयी होईल असा दावा दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी केला आहे. देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) जरी दक्षिण नागपूरच्या भाजप उमेदवार मोहन मते च्या पाठीशी उभे असले तरी माझ्या पाठीशी कृष्णरुपी जनता आहे, आणि कृष्णेच्या सहाय्याने पांडवांचा विजय होईल असा विश्वास गिरीश पांडव यांनी व्यक्त केला आहे. 

माझे सख्खे बंधू किरण पांडव हे मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू आहे, तरी त्यांच माझ्याशी रक्ताचा नातं आहे. त्यामुळेच ते महायुतीच्या प्रचारात दिसत नसावे. ते (मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव) प्रत्यक्षपणे माझ्या प्रचारात नसले, तरी त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. दक्षिण नागपुरात आम्ही परिवर्तन घडवून दाखवू असा, दावाही गिरीश पांडव यांनी केला आहे.

दक्षिण नागपूर विधानसभा-2019 

मोहन मते - भाजप ८४.३३९

गिरीश पांडव - काँग्रेस ८०,३२६

शंकर थूल - बसपा ५६६८

रमेश पिसे - वंचित

सतीश होले- अपक्ष ४६३१

दक्षिण नागपूर विधानसभा- 2014 

सुधाकर कोहळे- भाजप ८१,२२४

सतीश चतुर्वेदी काँग्रेस ३८,०१०

सत्यभामा लोखंडे - बसपा २३.१५६

शेखर सावरबांधे अपक्ष १५,१०७

हे ही वाचा 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
Embed widget