एक्स्प्लोर

Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी, कोण-कोण भिडणार? 12 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील 12 मदरसंघात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रणशिंग फुकलं असून दिवाळीच्या फटाक्यानंतरच प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी 4 नोव्हेंबरर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने अंतिम लढती आता निश्चित झाल्या आहेत. दरम्यान, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur) जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कारण, नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.तर नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असून शिंदेंच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवर आव्हान दिले आहे. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.     

दरम्यान, लोकसभा निवडणुकांतील यशाचा आधार घेत आणि अपयशाला पाठीशी टाकत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे दिसून येतंय. तर काही ठिकाणी मनसे आणि वंचितसह इतर पक्षही रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांवर विजय मिळवणारी महाविकास आघाडी तर 17 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीमध्ये लढाई आहे. मात्र, गेल्या लोकसभेला विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत मोठे यश संपादन केलं आहे. त्यामुळे या विधानसभेत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
 1  नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल्ल गुडधे(काँग्रेस)     
2 नागपूर दक्षिण विधानसभा  मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (काँग्रेस) अनुप दुरुगकर (मनसे)  
नागपूर पूर्व विधानसभा   कृष्णा खोपडे (भाजप) दुनेश्वर पेठे (NCP-SP) आभा पांडे (अपक्ष)  
नागपूर मध्य विधानसभा प्रविण दटके (भाजप) बंटी शेळके (काँग्रेस) रमेश पुणेकर (अपक्ष)  
नागपूर पश्चिम विधानसभा  सुधाकर कोहळे (भाजप) विकास ठाकरे(काँग्रेस) प्रकाश गजभिये (बसपा)  
नागपूर उत्तर विधानसभा  डॉ. मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)  मनोज सांगोळे (बसपा)  
 काटोल विधानसभा चरणसिंग ठाकूर (भाजप) सलील देशमुख (NCP-SP) अनिल देशमुख (NCP-AP)  
कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)  सुरेश भोयर (काँग्रेस) विक्रांत मेश्राम (बसपा)   
उमरेड विधानसभा सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस) प्रमोद घरडे (अपक्ष)  
10  सावनेर विधानसभा डॉ. आशिष देशमुख (भाजप) अनुजा सुनील केदार (काँग्रेस) घनश्याम निखाडे (मनसे)  
11  हिंगणा विधानसभा समीर मेघे (भाजपा)   रमेशचंद बंग (NCP-SP) डॉ. देवेंद्र कैकाडे (बसपा)  
12  रामटेक विधानसभा  आशिष जयस्वाल (शिंदेसेना) विशाल बरबटे (शिवसेना ठाकरे गट)  राजेंद्र मुळक (अपक्ष)  

नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12  (Nagpur MLA List)

  • काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)

  • सावनेर विधानसभा -  सुनील केदार (काँग्रेस)

  • हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)

  • उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे

  • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)

  • नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते  (भाजप)

  • नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)

  • नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)

  • नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)

  • नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)

  • कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)

  • रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष) 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget