एक्स्प्लोर

फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेची नापसंती, सिक्कीममध्ये भाजपचा धुव्वा; पक्ष गमावलेले प्रेमसिंह तमांग मुख्यमंत्री होणार

Sikkim Assembly Election: ईशान्येकडील सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला खातंही उघडता आलेलं नाही.

Sikkim Assembly Election: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचं (BJP) कमळ सलग तिसऱ्यांदा वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच रविवारी सिक्कीम (Sikkim) आणि अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Elections Result) जाहीर करण्यात आले. लोकसभेत मुसंडी मारण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचा सिक्कीम विधानसभेत मात्र, सुफडा साफ झाला आहे. 

ईशान्येकडील सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला खातंही उघडता आलेलं नाही. विधानसभा निवडणूक निकालाच्या 32 पैकी 31 जागा जिंकून सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या प्रेमसिंह तमांग यांनी संपूर्ण विरोधी पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानण्यास भाग पाडलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सिक्कीममध्ये मावळत्या विधानसभेत भाजपचे 12 आमदार होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. 

ईशान्येकडील महत्त्वाच्या राज्यांमध्ये सिक्कीमचाही समावेश होतो. गेल्या विधानसभेत भाजपचे 12 आमदार होते. पण यातील ट्वीस्ट म्हणजे, 2019 च्या निवडणुकीतही भाजपला सिक्कीममध्ये भोपळा फोडता आला नव्हता. भाजपचा प्रभाव तसा ईशान्येकडील राज्यांमध्ये नगण्यच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. पण मोठ्या उलटफेऱ्यानंतर एकही जागा न जिंकताही भाजपच्या आमदारांचे संख्याबोळ 12 झालं होतं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिक्कीममध्ये काय झालं? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती आणि पक्षाचा मतांची टक्केवारी फक्त 1.62 टक्के होती. तेव्हा सत्ताधारी असलेल्या सिक्कीम डेमोक्नेटिक पक्षाला सत्ता गमवावी लागली. 32 सदस्यीय विधानसभेत या पक्षाचे 15 आमदार निवडून आले होते. ईशान्येकडील राज्यांमध्ये अन्य पक्षांमध्ये फोडाफोडी करूनच भाजपनं आपले हातपाय पसरले. सिक्कीममध्ये पराभूत झालेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाच्या 15 सदस्यांपैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर नंतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपनं दोन जागा जिंकल्या होत्या. यामुळेच 2019 च्या निवडणुकीत एकही जागा न जिंकताही भाजपच्या आमदारांचे संख्याबळ 12 झाले होते. सिक्कीममधील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाबरोबर भाजपनं हातमिळवणी केली होती. विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून बिनसलं. परिणामी भाजप स्वतंत्रपणे लढला होता.

सिक्कीमच्या विजयाचा खरा नायक 'प्रेमसिंह तमांग'

सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चानं मोठा विजय मिळवला आहे. या विजयाचा खरा नायक कोणी असेल तर, प्रेमसिंह तमांग. यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या पक्षानं सिक्कीममध्ये 32 पैकी 31 विधानसभा जागा जिंकल्या आहेत. सिक्कीमचे लोक त्यांना प्रेम सिंह गोले असंही म्हणतात. प्रेमसिंह यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, ते कोणत्याही राजकीय घराण्यातील नाहीत. किंबहुना त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. 

1993 मध्ये, जेव्हा पवन कुमार चामलिंह सिक्कीममध्ये सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट, SDF या नवीन पक्षाची स्थापना करत होते, तेव्हा प्रेमसिंह तमांग यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात प्रवेश केला. पवन कुमार चामलिंग यांच्यासोबत पक्ष स्थापन करण्यात प्रेमसिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आलं. 1994 मध्ये प्रेमसिंह तमांग आमदार झाले. नंतर मंत्री झाले, पुढे सिक्कीमच्या निवडणुकीत एसडीएफ विजय मिळवतच राहिली आणि पवन कुमार चामलिंग मुख्यमंत्री होत राहिले.  त्यानंतर 2009 पर्यंत प्रेमसिंह तमांग देखील चामलिंग सरकारमध्ये मंत्री होत राहिले. 

निधीचा अपहार केल्याबद्दल 2016 मध्ये तुरुंगवारी 

2016 मध्ये, तमांग यांना 1994 ते 1999 दरम्यान सरकारी निधीची अपहार केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं. प्रेमसिंह तमांग हे राज्यातील पहिले राजकारणी होते ज्यांना दोषी ठरवून विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. 2018 मध्ये जेव्हा तमांग तुरुंगातून बाहेर आले. 

बंडखोरी करत नवा पक्ष स्थापन

4 फेब्रुवारी 2013 रोजी प्रेमसिंह यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला आणि त्याचं नाव सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा ठेवलं. प्रेमसिंह यांनी 2014 ची निवडणूक याच पक्षाकडून लढवली होती. नव्यानं स्थापन झालेल्या पक्षानं 32 पैकी 10 जागा जिंकल्या आणि प्रेमसिंह विरोधी पक्षनेते बनले. मात्र, 2016 मध्ये प्रेमसिंहं यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांना दोषी ठरविण्यात आल्यावर ते आमदारपदावरून अपात्र ठरलेले सिक्कीमचे पहिले नेते ठरले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget