Shrikant Shinde: कल्याण लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार : श्रीकांत शिंदे
संजय राऊत यांचं वक्तव्य हे मनोरंजनासाठी आहे. त्यांना त्याच दृष्टीने पाहायचं जास्त गांभीर्याने घ्यायचे नाही, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांवर केली आहे.
कल्याण: कल्याण-डोंबिवली (Kalyan Lok Sabha Election 2024) विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ, कायम चर्चेत राहिलाय. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आलाय आणि कारण ठरलंय श्रीकांत शिंदें यांच वक्तव्य. आगामी लोकसभा कल्याण लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय. तसेच कल्याणचा खासदारही मीच राहणार , असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय.
श्रीकांत शिंदे म्हणाले, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असल्याचे चर्चा होती .याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येतोय. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवसेना भाजपच्या युती आहे युतीवर विश्वास ठेवणारा या ठिकाणचा मतदार आहे . शिवसेनेला किती जागा मिळणार भाजपला किती जागा मिळणार याबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील योग्य वेळी योग्य प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळेल.
श्रीकांत शिंदेंची राजू पाटील यांच्यावर सडकून टीका
दिवा येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असं लिहिलेला केक कापला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात राजू पाटील हे मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती . खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टीका केली . श्रीकांत शिंदे यांनी बोलताना म्हणाले की, काही लोकांना टीका करण्याची सवय आहे. पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली त्यात काही केलं नाही आणि आता स्वप्न पडायला लागली आहेत. स्वप्न पाहणं वाईट नाही मात्र आजीच्या पुढे माजी लागता कामा नये अशी उपहासात्मक टीका केली . दुसऱ्यांनी केलेली पाहणी पाहायची ,टीका करायची ,आधी स्वतः कामे करा ,मी कुणाचं नाव लावून घेतलं नाही ,कुणाला लावून घ्यायचं असेल तर लावून घेऊ शकता. पाच वर्षात साधं ऑफिस सुरू केलं नाही अशी सडकून टीका नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली.
संजय राऊत यांचं वक्तव्य मनोरंजनासाठी : श्रीकांत शिंदे
आमदार अपात्र तेबाबत संजय राऊत यांनी केलेला वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली .संजय राऊत यांचं वक्तव्य हे मनोरंजनासाठी आहे. त्यांना त्याच दृष्टीने ते पाहायचं जास्त गांभीर्याने घ्यायचे नाही, राऊतांना बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्ध मिळत नाही. प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी दिसण्यासाठी बरळत असतात अशी टीका शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
हे ही वाचा :
Shrikant Shinde On Aditya Thackeray : त्यांनी त्यांच्या पप्पांना हा प्रश्न विचारला पाहिजे; श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका