एक्स्प्लोर

'तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश!' : शिवसेना

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.   राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल आणि ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना? राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे, असं लेखात म्हटलं आहे.  केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन, असं लेखामध्ये म्हटलं आहे. 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपच्या बाजूने गेले आणि त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले. अर्थात जो जिता वोही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष आणि उत्सव सुरू आहे. जणू काही फार मोठा चमत्कारच घडवला आहे, अशा पद्धतीचे अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत, असं लेखात म्हटलं आहे. 

लेखामध्ये सांगितलं आहे की, एक साधा विषय समजून घेतला पाहिजे, महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेच्या वेळी 170 आमदारांचे बळ होते. विधानसभा अध्यक्षांना थेट मतदानात भाग घेता येत नसल्याने हा आकडा 169 वर येतो. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने 161 आमदारांनी मतदान केले. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि ज्यांचे मत 'बाद' करायला लावले ते सुहास कांदे पकडले तर आकडा होतोय 164. शिवसेनेचे एक आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. पंढरपूरची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली. हा सर्व हिशेब केला तर आजही आमदारांची संख्या 166 इतकी आहे. म्हणजे विश्वासदर्शक ठरावापेक्षा संख्या 3 नेच कमी आहे. या तीन मतांपैकी अपक्षांची दोन मते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीबरोबर नव्हती.  त्यामुळे सहाव्या जागेच्या विजयाने महाराष्ट्रात मुंगीने मेरू पर्वत गिळला हो, अशी जी हाकाटी सुरू आहे त्यात दम नाही, असं लेखात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? 

अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? खरे तर राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील सर्व आक्षेप फेटाळले. हा त्यांचा अधिकार असतानाही त्या अधिकारावर दिल्लीतून अतिक्रमण झाले. विधिमंडळातील कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या आणि त्याबरहुकूम काय घडविण्यात आले त्याचा स्फोट झाला तर देशातील लोकशाही व निवडणूक पद्धतीचा मुखवटा जगासमोर गळून पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया तांत्रिक आणि किचकट आहे हे खरे असले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मते पक्की राहिली. त्यामुळे या सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे राज्यातील सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे व भक्कम राहील, असंही लेखात म्हटलं आहे.

 विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  सहाव्या जागेच्या विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले ते खरे असेलही. त्यांनी ज्या पद्धतीने मतांचे नियोजन केले त्यामुळे दुसऱ्या फेरीत सहाव्या उमेदवाराची मतसंख्या वाढली हे खरे असले तरी यात राजकीय भाग्याचेही महत्त्व आहे. पहिल्या पसंतीची 33 मते शिवसेना उमेदवार संजय पवारांना तर 27 मते धनंजय महाडिकांना होती. तरीही पवार हरले. अशी गणिते इतर राज्यांतही मांडण्यात आली. हरयाणातही महाराष्ट्राप्रमाणे खेळ झाल्याने काँग्रेसचे अजय माकन हे 'पाव' मताने हरले. त्यांचा पराभवही संशयाच्या भोवऱ्यात आहे. माकन यांना तर आधी विजयी घोषित केले होते. राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत. अशा निवडणुकांत 'आमदार'रूपी माणसे गोळा करणे, त्यांना सांभाळणे, टिकवणे हे लोकशाही पद्धतीत दिव्य होऊन बसले आहे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी असा प्रकार त्यातूनच होतो, असं ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget