Maharashtra CM Oath Ceremony: आझाद मैदानात मोठ्या संख्येनं या, महायुती सरकारच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आदेश
Maharashtra CM Oath Ceremony : शिवसेनेच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.
दरम्यान, राज्याच्या सत्तास्थापनेच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेवेळी मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल, असे सांगितले आहे.
महायुतीतील नेत्यांच्या शिष्ठाईला यश?
असे असताना, शिवसेनेच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्याच्या शपतविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली अश्या शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेस अरेंज करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच मोठ्या संख्येने कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना आझाद मैदानात बोलवण्यात आले आहे. उद्या नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यात नवीन सरकारचा मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्री आणि इतर मंत्री शपथ घेणार. दरम्यान, आजच्या राज भवनातील पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांची शपथ विधिबाबत कोणतेही स्पष्टता दिलेली नसल्याने एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिंदे सेनेचे अनेक आमदार वर्षा या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या शिष्ठाईला यश आले असून एकनाथ शिंदे हे देखील उद्या शपत घेणार आसल्याचे बोलले जात आहे.
शिंदे यांनी नेतृत्व करावं, शिवसेनेच्या आमदारांचा वर्षावर सूर
संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. त्यामुळे राज भवनातील पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांची शपथ विधिबाबत कोणतेही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आता याच मुद्यावरून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिंदे सेनेचे अनेक आमदार वर्षा या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करावं , असा सर्व शिवसेनेच्या आमदारांचा सूर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा