एक्स्प्लोर

Manoj Jarange : ...म्हणून आम्ही विरोध केला; मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची घोषणा होताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jaranage on Devendra Fadnavis : राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.  उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.

दरम्यान, आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत असतो त्याच्याशीच भांडावं लागतं. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडलो. कारण मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणाचा प्रश्न होता. मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडण नाही तर सोडणार सुद्धा नाही. सरकारला गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागतील. त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू दे मी सोडणार नाही. असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.   

उपोषण होणार म्हणजे होणार!- मनोज जरांगे

उपोषण 100% अंतरवलीत होणार. पण थोडं पुढे जायचं असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर उपोषण होण्याची देखील शक्यता आहे. उपोषण होणार असून ते सामूहिक उपोषण होणार आहे. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. मी कधीच ओबीसी बांधव आणि त्या समाजाला विरोधक मानलेले नाही. मी सामान्य ओबीसींना एका शब्दाने देखील दुखावले नाही. आम्हाला ओबीसीचां विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. तुमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार. असेही ते म्हणाले. 

मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही- मनोज जरांगे

मराठ्यांची बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही. एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरं नाही. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही आणि वेड्यावानी करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget