Sharad Pawar : फोडाफोडीचे राजकारण थांबेल असं दिसतं नाही, बहुमत असताना असं करण्याचे कारण काय? शरद पवारांचा खोचक सवाल
Sharad Pawar : महायुतीकडे 232 इतकी संख्या असताना फोडाफोडीचे राजकारण करण्याचे कारण काय, हे काही कळत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे.
Sharad Pawar कोल्हापुर : राज्यात विरोधी पक्ष प्रभावी असू नये याची काळजी घेतली जातेय. पण लोकांमध्ये या सगळ्याबाबत नाराजी व्यक्त केली जातेय. इतकं मोठं बहुमत मिळालं असताना राज्यात म्हणावा तसा उत्साह दिसून येत नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मात्र मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत. पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. असे असले तरी ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत. दरम्यान, विधानसभेचा निकाल काहीही लागला तरी थांबायचं नसतं. निकाल लागलेल्या दुसऱ्या दिवशी मी कराडला आलो. राज्यात फोडाफोडीचे राजकारण थांबेल असं दिसतं नाही. कुठं कुठं काय काय चालू आहे असं दिसतं आहेत. मात्र 232 इतकी तुमची संख्या असताना फोडाफोडीचे राजकारण करण्याचे कारण काय, हे काही कळत नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ममता बॅनर्जी यांच्यात इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता- शरद पवार
ममता बॅनर्जी यांच्यामध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आक्रमक आहे, त्यांनी अनेक माणसं उभी केली आहे. त्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही शरद पवार म्हणाले. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं. अबू आजमी यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यामुळे मी अधिक त्यावर बोलणार नसल्याचे ही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या