एक्स्प्लोर

Satara Loksabha Bypoll | शरद पवार भिजले, उदयनराजे हरले!

राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर शरद पवारांनी साताऱ्यातील सभेत निशाणा साधला. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली त्यांनी दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात बसला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं असलं तरी या विजयाचे खरे शिल्पकार शरद पवारच आहेत. शरद पवारांची पावसात सभा पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबर साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांची दृश्ये प्रेरणादायी ठरली. व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर केवळ पवारांच्या भर पावसातील भाषणाची चर्चा होती. या सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली. साताऱ्यात कॉलरचा नाही तर स्कॉलरचा विजय उदयनराजे भोसले यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच झाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले, त्यानंतर राज्यपाल पद भूषवलेले, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उदयनराजेंविरोधात उमेदवारी दिली. उदयनराजे त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना सिनेमाचे डायलॉग मारत कॉलर उडवताना पाहिलं आहे. त्यामुळे साताऱ्यात कॉलरचा नाही तर स्कॉलरचा विजय झाल्याचं म्हटलं जात आहे. श्रीनिवास पाटील दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील : पृथ्वीराज चव्हाण श्रीनिवास पाटील उदयनराजेंविरोधात तब्बल दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात व्यक्त केला होता. उदयनराजेंसाठी पंतप्रधान मोदींची सभा साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे. सलग तीन वेळा खासदार उदयनराजे भोसले याआधी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवड झाली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातली राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये उदयनराजेंचा समावेश होता. परंतु खासदार झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुखDevendra Fadnavis on Chandiwal : मविआ काळातील भ्रष्टाचाराचे मोठे पुरावे समोर आले - फडणवीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके
ओबीसी समाज लोकसभेचा बदला घेणार, विधानसभेला तुतारीचे सर्व उमेदवार आडवे करणार: लक्ष्मण हाके
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
Embed widget