एक्स्प्लोर
काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण
आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही शिवाय आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरणही स्व:त सपना चौधरीने दिलं आहे. मात्र तिचा काँग्रेसमधील सदस्यत्वाचा फॉर्म समोर आला आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याबाबत हरियानाची डान्सर सपना चौधरीने नकार दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही शिवाय आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरणही स्व:त सपना चौधरीने दिलं आहे. मात्र तिचा काँग्रेसमधील सदस्यत्वाचा फॉर्म समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग जंग पछाडताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस सपना चौधरीला हेमा मालिनी यांच्या विरोधात उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती.
मात्र या चर्चेला सपना चौधरीने पुर्णविराम दिला आहे. आपण निवडणूक लढवणार नाही, अशी माहिती तिने दिली आहे. मागील काही दिवसांपासून सपना चौधरीचा काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी शक्यता वर्तवली जात होती. शिवाय काँग्रेस नेते राज बब्बर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 'सपना चौधरी आपलं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे, असं ट्वीट केलं होतं.' या ट्वीटसोबत राज बब्बर यांनी सपना चौधरीचा प्रियांक गांधी यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला होता.
VIDEO | काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण | एबीपी माझा
यावर बोलताना सपना चौधरी म्हणाली की, माझे प्रियांका गांधींसोबतचे फोटो हे जुने आहेत. जसं जुणे मुलाखती बाहेर काढले जातात, तसं जुने फोटोही बाहेर काढले जाऊ शकतात, असं सपना चौधरी म्हणाली. आपण काँग्रेस नेते राज बब्बर यांनाही भेटलो नसल्याचंही तिने सांगितलं. त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसून भविष्यातही जाणाच्या इच्छा नसल्याच तिने सांगितलं.
मात्र सपनाच्या स्पष्टीकरणानंतर तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पुरावा हाती लागला आहे. तिने काँग्रेस सदस्यत्वासाठी भरलेला फॉर्म आणि फॉर्म भरतानाचे फोटोही समोर आले आहे. त्यामुळे सपना चौधरी खोटं बोलतं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सपना चौधरी 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वात सहभागी झाली होती. त्यामुळे हरियाणाची डान्सर असूनही सपना चौधरीचे चाहते सर्वत्र आहेत. नुकतंच तिने एका बॉलिवूडपटातही भूमिका केली होती. सपनाच्या वडिलांचं तिच्या बाराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर भाऊ आणि आईची जबाबदारी तिच्यावर पडली. सपनाने गायन आणि नृत्यातच आपलं करिअर केलं.
VIDEO | आचारसंहितेत 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट प्रदर्शित झाल्यास मनसेचा खळखट्ट्याकचा इशारा | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement