एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचा काटशह, अहमदनगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगतापांना तिकीट
सुजय विखे भाजपच्या तिकीटावर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे.
![राष्ट्रवादीचा काटशह, अहमदनगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगतापांना तिकीट Sangram Jagtap is NCP candidate for Ahmednagar Loksabha seat against Sujay Vikhe राष्ट्रवादीचा काटशह, अहमदनगरमधून सुजय विखेंविरोधात संग्राम जगतापांना तिकीट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/20184224/Sangram-Jagtap.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ज्या अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीमध्ये बिघाडी झाली होती, त्या जागेवर अखेर राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना दक्षिण अहमदनगर या लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता.
सुजय विखे भाजपच्या तिकीटावर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. पर्यायाने अहमदनगरची लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
अहमदनगरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? 'ही' दोन नावं चर्चेत!
अहमदनगरच्या जागेसाठी अरुणकाका जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावं चर्चेत होती. जगताप हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत घराणं असून त्यांचा नगरमध्ये दबदबा आहे. मात्र अरुण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे 'संग्राम'कार्ड टाकत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला काटशह देण्याचाच प्रयत्न केला आहे. आता दक्षिण नगरची लोकसभा निवडणूक दोन तरुण उमेदवारांच्या लढतीमुळे तुल्यबळ होणार, हे निश्चित. केडगाव हत्या प्रकरणात तुरुंगवारी केडगावमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन भाजप आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संग्राम जगताप नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीतही होते. त्यानंतर प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदार-फिर्यादीवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. अहमदनगर महापालिकेतील गेम अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला होता. पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. संग्राम जगतापांसह राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र आम्ही सत्तेत सहभागी होणार नाहीत. भाजपला केवळ बाहेरुन पाठिंबा दिल्याचं जगतापांनी सांगितलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रीडा
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)