एक्स्प्लोर
विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात मनोमिलन, कडेगावमध्ये युवा नेत्यांची भेट
काही दिवसांपूर्वी विशाल आणि विश्वजित या दोघांनी उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापलं होतं. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंतदादा गट आणि कदम गटातील वादाला तोंड फुटलं होतं.
सांगली : एकाच पक्षात असूनही एकमेकांवर टीकेची झोड उठवण्याची एकही संधी न सोडणारे विश्वजित कदम आणि विशाल पाटील या काँग्रेसच्या दोन युवा नेत्याचे लोकसभा निवडणुकीत पुन्हा मनोमिलन झालेलं दिसून येत आहे. सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. विशाल पाटील यांनी काल कडेगावमध्ये विश्वजित कदम यांची भेट घेतली. या भेटीतून पक्षांतर्गत वादावर पडदा टाकत या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत एकमेकांना साथ देण्याचे आणि अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी प्रयत्न केले.
काही दिवसांपूर्वी विशाल आणि विश्वजित या दोघांनी उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापलं होतं. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंतदादा गट आणि कदम गटातील वादाला तोंड फुटलं होतं. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी विश्वजित कदम यांनीही प्रयत्न केले होते.
विशाल पाटील यांना शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षातील नाराज नेत्यांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात त्यांनी विश्वजित कदम यांच्यापासून केली. याचबरोबर राजू शेट्टी, विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांनी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांचीही भेट घेतली. श्रमिक मुक्ती दलाचा विशाल पाटील यांना पाठिंबा आहे. एकूणच विशाल पाटील यांच्याकडून पक्षातील, अन्य पक्षातील तसंच नाराज झालेल्या वसंतदादा गटचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोण आहेत विशाल पाटील?
- विशाल प्रकाशबापू पाटील
- सध्या, चेअरमन वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना
- अध्यक्ष वसंत विकास प्रतिष्ठान
- स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू
- स्व. खासदार प्रकाशबापू पाटील यांचे तृतीय चिरंजीव
- आई शैलजा भाभी पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा
- बंधू, प्रतीक पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री
- सह्याद्री मोटर्स सांगलीचे वितरक
- उच्चशिक्षित असलेले विशाल पाटील काँग्रेसचे सक्रिय नेते, कुस्ती आणि खेळाची आवड, सांगलीत वसंतदादा महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कला जोपासण्याचे काम ते करत आहेत.
- बंद पडलेला सांगलीचा वसंतदादा साखर कारखान्याचे जबाबदारी स्वीकारुन त्यांनी तो कारखाना अडचणीतून बाहेर काढलाच शिवाय कारखान्याकडून शेतकऱ्यांची देणी आणि बिलंही भागवली.
- विशाल पाटील हे सांगली विधानसभेसाठी इच्छूक होते, मात्र त्यांच्यावर थेट लोकसभेचे उमेदवार म्हणून जबाबदारी टाकण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement