एक्स्प्लोर

Rohit Pawar : रोहित पवारांचा सोलापुरात धमाका, करमाळ्यात संजय शिंदेंना दे धक्का, बार्शीत सोपलांची ताकद वाढवली

Rohit Pawar, सोलापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी करमाळ्यात अपक्ष आमदार संजय शिंदे यांना धक्का दिलाय.

Rohit Pawar, सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  स्वत:चा मतदारसंघ सांभाळत सोलापुरात देखील सक्रिय झाले आहेत. बार्शीत (Barshi) महाविकस आघाडीच्या नेत्यांची ताकद वाढण्यासाठी रोहित पवार अॅक्टिव्ह आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे (Sanjay Shinde) यांना मोठा धक्का बसलाय. संजय शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला  आहे. त्यामुळे संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे बार्शीतील वैराग भागाचे नेते निरंजन भूमकर (Niranjan Bhumkar) यांनी अजित पवारांची साथ सोडत रोहित पवारांच्या उपस्थित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे निवडणुकीच्या काळात ठाकरेंचे बार्शीचे उमेदवार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांची ताकद वाढवली आहे. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आहेत, त्यामुळे वैराग भागातून सोपलांना ताकद मिळणार असल्याचे बोलले जाते. 

फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत तर ते नवीन युगाचे जनरल डायर 

रोहित पवार म्हणाले, आपली लढाई प्रत्येक मतदार संघातील उमेदवार विरुद्ध भाजप अशी आहे. फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत तर ते नवीन युगाचे जनरल डायर आहेत.  अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला. धनगरांना आरक्षण दिले नाही. मराठा , ओबीसी असे अनेक आंदोलन सुरू होती, ती गुजरातच्या पद्धतीने पायाखाली तुडवायची असते, असे विधान अमित शाह यांनी केले. 

आपले सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, अपक्ष आमदार भाजप सोबत मांडीला मांडी लावून बसला त्यामुळे तुम्ही भाजपचेच उमेदवार आहे. आम्ही रीटेवाडी योजना मार्गी लावणार आहोत. आपले सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. लाडकी बहिणी योजना आपण बंद करणार नाही. उलट नव्या पद्धतीने आपण लवकरच जाहीर करत आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये घाबरले व भरमसाठ योजना आणल्या. सत्तेतील नेते येवून कितीही आश्वासने दिली तरी ऐकू नका. बारामती ऍग्रो आता विस्तारीकरण होत असून उसाचे एक टिपूर राहणार नाही. ही महाराष्ट्र धर्म टिकविण्याची लढाई आहे. 10 वर्षात भाजपने महाराष्ट्राची घसरण केली आणि गुजरातची प्रगती केली. ही लढाई स्वाभिमान राखण्यासाठी बळी पडू नका. मताला 500 रुपये दिले म्हणजे फक्त रोज 30 पैसे, तेवढ्यावर मतं विकू नका. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pratibha Pachpute : पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार, न ऐकल्यास सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार , प्रतिभा पाचपुतेंची भूमिका जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget