Ratnagiri Municipal Council Reservation Announced : रत्नागिरी नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर; पाहा कोणता प्रभाग, कोणासाठी आरक्षित?
Ratnagiri Municipal Council Reservation Announced : नगर परिषदेच्या येत्या निवडणूकीसाठी शहरातील प्रभाग रचना बदल झाला आहे. पुर्वी असलेल्या 15 प्रभागांमध्ये नव्या रचनेत आणखी एका प्रभागाची भर पडली आहे. 30 वरुन 32 वॉर्ड झालेत.
Ratnagiri Municipal Council Reservation Announced : स्थानिक स्वराज्य संथांमधील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर प्रथमच होणाऱ्या परिषदेंच्या निवडणुकींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नगर परिषदांचं आरक्षण जाहीर झालं आहे. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तालुक्यातील नगरपरिषदेच्या प्रभागाच्या आरक्षण सोडत काढण्यात आल्या.
रत्नागिरी (Ratnagiri) शहरात 16 प्रभागातील नगरसेवकांसाठी आरक्षण जाहीर
नगर परिषदेच्या येत्या निवडणूकीसाठी शहरातील प्रभाग रचना बदल झाला आहे. पुर्वी असलेल्या 15 प्रभागांमध्ये नव्या रचनेत आणखी एका प्रभागाची भर पडली आहे. 30 वरुन 32 वॉर्ड झालेत. तर आता पडलेल्या 15 प्रभागांच्या आरक्षणात प्रत्येकी दोन नगरसेवक कार्यरत राहणार आहेत. त्यांचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे जाहीर झाले आहेत. तर प्रभाग 9 मधील नगरसेवक पदांच्या 2 जागांपैकी 1 जागा अनुसूचित जाती जमातीसाठी आणि एक सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी आरक्षित झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरी परिषदेची (Ratnagiri Municipal Council Reservation) विभाग रचना यापूर्वीच जाहीर केली होती.
चिपळूणात महिलाराज आता 50 टक्के जागांवर
पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी सोडत काढण्यात आली. यात 28 नगरसेवकांपैकी 14 जागा महिलांसाठी राखीव तर उर्वरित 13 जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. महिला आरक्षणामुळे अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाल्यानं त्यातील काहींनी आपल्या पत्नीला या निवडणुकीत उतरवण्याचं ठरवलं आहे.
राजापूरातील 1 जागा अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी राखीव
राजापूर नगरपरिषदेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्यामुळे आता राजापूर नगरपरिषदेची नगरसेवक संख्याही आता 17 वरून 20 इतकी आली आहे. यात एक जागा ही अनुसूचित जाती जमाती महिलांची राहणार आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्या निकषाप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 मधील जागा ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
खेड नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
या नगरपरिषदेत 10 प्रभाग झाले असून जाहीर आरक्षणानुसार महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येक प्रभागात 1 महिला याप्रमाणे 10 महिला नगरसेवकपदाची निवडणूक लढवून नगरपरिषदेत जाणार आहेत. उर्वरित 10 जागांवर पुरुष याप्रकारे आरक्षण झालं आहे.