Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीती; आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार
Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत.निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे.
Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात शिवसेना या निवडणुकीसाठी सतर्कता बाळगत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती अशी असेल
हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकही नजर ठेवणार आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना विश्वास देतील, भाजप कसं राजकारण करतंय हे सांगितल, आपण कसे जिंकणार हे आमदारांना पटवून देणार आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॅाटेलवर घेऊन जाण्यात येईल.
सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या विविध टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला असतील. येणा-जाणाऱ्या आमदारांवर शिवसेनेचे कार्यकर्ते नजर ठेवतील . सकाळी सर्व आमदारांची स्वाक्षरी एका कागदावर घेतली जाईल . त्यानंतर पुन्हा बसने आमदरांना ट्रायडंट येथे घेऊन येण्यात येईल. मुख्यमंत्री महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत.
या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित राहतील आणि पुन्हा हॅाटेलवर येतील. मराठवाड्याच्या बैठकीला मोजकेच नेते आणि फक्त मराठवाड्यातले सहा आमदार उपस्थित राहतील. सभा संपल्यानंतर मराठवाड्यातले सहा आमदारांना विशेष विमानानं मुंबईत आणण्यात येईल.
महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल
सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ
शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
माकप - 1
शेकाप - 1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1
अपक्ष - 9
सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172
......................
विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ
भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 4
विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112
इतर महत्वाच्या बातम्या
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीआधी 'मविआ'ला धास्ती, सर्व आमदारांना ठेवणार हॉटेलमध्ये
Rajya Sabha Election 2022 : अपक्ष आणि इतर 29 आमदार किती महत्त्वाचे, घोडेबाजार होणार?
Rajya Sabha Election 2022 : राज्यात घोडेबाजार शब्दावरून राजकारण, मात्र घोडेबाजारचा अर्थ काय?