एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मनसेच्या दुखावल्या गेलेल्या मावळ्यांना साद घातली, पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलेल्यांबाबतही महत्त्वाचं भाष्य; नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत नाराज कार्यकर्त्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांबाबत भर सभेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच, रागावून किंवा नाराज होऊन ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांबाबतही राज ठाकरे यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले की, मी 20 वर्षांनी पहिल्यांदा युती करतोय. त्यामुळे या युतीच्या प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीट नाही देता आली, अनेक जण नाराज झाले. काहींना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही गोष्टी झाल्या आणि होतात. त्या आमच्या हातात नसतं. पण, त्यांना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. तरी जे नाराज झाले असतील त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले. 

Raj Thackeray: जे गेले आहेत, ते परत येतील

नाराज होऊन पक्ष सोडलेल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “जे गेले आहेत ते आपलेच आहेत. ते परत येतील. कारण आता जे आहेत, ते कुठे जातील याची खात्री नाही. त्यामुळे जे गेले आहेत, ते परत येतील. या सर्व गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो", असंही त्यांनी सांगितलं  

Raj Thackeray: शिवाजी पार्कच्या आठवणींना उजाळा

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कशी जोडलेल्या भावनिक आठवणींनाही उजाळा दिला. “मी लहान असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत या व्यासपीठावर अनेकदा आलो आहे. शिवसेनेची स्थापना याच शिवतीर्थावर झाली. त्यावेळी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील श्रीकांत ठाकरे आणि आमची माँ उपस्थित होते. आज मी आणि उद्धव एकत्र आलो असताना, हे सगळे जर इथे हजर असते तर हा क्षण अधिक भावनिक झाला असता. मात्र, मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी उभा राहिलेला हा लढा ते वरून नक्कीच पाहत असतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray: मुंबईवरील संकटामुळेच युती 

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, “मी आणि उद्धव एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट. गेल्या अनेक वर्षांपासून मी सांगतोय की, मुंबईविरोधात कशा पद्धतीने डाव रचला जातोय. हिंदी सक्तीचा विषय आला, तेव्हा मी आणि उद्धव दोघेही कडाडलो. कारण कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Girish Mahajan on Raj Thackeray: राज ठाकरेंनी महाजनांना लाकूडतोड्या म्हणत डिवचलं, आता गिरीश महाजनांचं जशास तसं उत्तर; म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget