एक्स्प्लोर

Girish Mahajan on Raj Thackeray: राज ठाकरेंनी महाजनांना लाकूडतोड्या म्हणत डिवचलं, आता गिरीश महाजनांचं जशास तसं उत्तर; म्हणाले...

Girish Mahajan on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा ‘लाकूडतोड्या’ म्हणून उल्लेख केला होता.

Girish Mahajan on Raj Thackeray: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकमधील (Nashik News) तपोवन (Tapovan) परिसरात सुरू असलेल्या तयारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. तपोवनातील झाडे छाटण्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा ‘लाकूडतोड्या’ म्हणून उल्लेख केला होता. या टीकेनंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना जशास तसं उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना मंत्री महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली होती. “संजय राऊत म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत,” असा घणाघाती टोला राज ठाकरेंनी लगावला होता.

Girish Mahajan on Nashik Tree Cutting: डाव्या विचारसरणीचे लोक अडथळे निर्माण करताय

या टीकेला प्रत्युत्तर देताना, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर आयोजित भाजपच्या सभेत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी आवश्यक तयारी सुरू असून, गेल्या दहा-बारा वर्षांत आपोआप उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून मुद्दाम वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली काही डाव्या विचारसरणीचे लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Girish Mahajan on Nashik Tree Cutting: आम्ही मोठी झाडे तोडणार नाही

महाजन म्हणाले की, “आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही अनेकदा दिली आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आली असून उर्वरित झाडांची लागवडही सुरू आहे. मात्र, नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकलेला नाही. तरीही झाडांना चिटकून बसून धार्मिक कार्यक्रमात खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

Girish Mahajan on Raj Thackeray: मला लाकूडतोड्या म्हणतात, बोलू द्या, ते मोठे आहेत

राज ठाकरे यांनी आपल्याला ‘लाकूडतोड्या’ म्हणत खिल्ली उडवल्याचा उल्लेख करत महाजन म्हणाले, “मी स्वतः २० हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांना आता जाग आली, ते झाडाला मिठी मारून गेले. राज ठाकरे काहीही बोलतात, मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात. मला लाकूडतोड्या म्हणतात; बोलू द्या, ते मोठे आहेत.”

Girish Mahajan on Raj Thackeray: पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेलाही महाजनांनी प्रत्युत्तर दिले. “फडणवीस हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलतात, अशी टीका होते; मात्र ते विकासाशिवाय काहीही बोलत नाहीत. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.

Girish Mahajan: ते एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही

महाजन यांनी यावेळी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि सलग निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी मविआवर टीका केली. “ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, महाविकास आघाडी एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्येही तो सार्थ ठरेल,” असा दावा त्यांनी केला.

आणखी वाचा 

Who is Balasaheb Thackeray true successor : बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? उद्धव, राज की एकनाथ शिंदे? जाणून घ्या काय सांगतो सर्व्हेचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget