आज पुण्यात राहुल गांधीची तोफ धडाडणार, काँग्रेसचे दिग्गज नेते राहणार उपस्थित
देशातील बड्या नेत्यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत. आज पुण्यात काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होणार आहे.
Pune loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 7 मे ला देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. राज्यातही महत्वाच्या मतदारसंघात या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. त्यादृष्टीनं देशातील बड्या नेत्यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत. आज पुण्यात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
रविंद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना
पुणे लोकसभा मतदारंघातून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिलीय. या दोघांमधील ही लढत अत्यंत महत्वपूर्ण मानली जातेय. दोन्ही उमेदवारांनी बड्या पुण्यात नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळं पुण्यातील लोकसभेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झालीय.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातील लढत ही महत्वपूर्ण मानली जातेय. ऐकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व निर्माण केलं. आता पुन्हा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केलीय. एक ते दोन अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवाराने या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. बापट यांनी मोठ्या मताधिक्याने जोशी यांचा पराभव केला.
दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर हा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली होती. काही दिवसांवरच लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या, त्यामुळं या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली नव्हती. दरम्यान, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याासाठी दोन्ही पक्षाकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र, भाजपनं पुण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलीय.
महत्वाच्या बातम्या:
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब; हायहोल्टेज लढत पुन्हा रंगणार