एक्स्प्लोर

PM Modi in Akola : नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलं; अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात

PM Modi : नेहरूंपासून आतापर्यंतच्या कांग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केलाय. त्यांचं योगदान काँग्रेसने नाकारलंय. असे म्हणत अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घणाघात केलाय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने (Congress) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar  ) वारंवार अपमान केला. नेहरूंपासून आतापर्यंतच्या कांग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केलाय. त्यांचं योगदान काँग्रेसने नाकारलंय. काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते, कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते.

मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी सदा-सर्वदा पूजनीय आहेत आणि राहतील. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. मी अकोल्यातून काँग्रेसच्या शाही परिवाराला आव्हान देतो की त्यांनी बाबासाहेबांच्या पंचतिर्थाला वंदन केलं हे सिद्ध करावं. असे थेट आव्हान देत अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 

काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल- नरेंद्र मोदी

काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. कांग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत आहे आणि हिच चाल आणि चरित्र काँग्रेसचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.'एक है तो,सेफ है असे म्हणत हरियाणात काँग्रेसचे मनसुबे उधळून लावलेत. जम्मू काश्मीर विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला.

मात्र तुम्हाला वाटतं का असं व्हावं? दहशतवादी संघटना, पाकिस्तानने हे कलम हटविण्याचा विरोध केला होता. काँग्रेस तिच भाषा बोलतेय. 370 लागू केलं तर काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संनिधान संपुष्टात येईल.दरम्यान, कोऱ्या पानांचं संविधान पुस्तक घेऊन फिरणारे लोक पापी आहेत, असे म्हणत मोदींनी राहूल गांधींना अप्रत्यक्षपणे टोला लागवला आहे.

सभेतील गर्दी विजयाचा विश्वास देणारी

370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमधल्या आदिवासी, दलितांना आरक्षण मिळालं होतं. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची आहे. महायुतीच्या उमेदवारांना बहूमताने जिंकवा. काल दोन सभा आणि आजची सभेतील गर्दी ही विजयाचा विश्वास देणारी आहे. असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याच्या सभेतून व्यक्त केला घरी. 

नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ-रामदास आठवले 

नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्याला आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. 370 कलम हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसला काश्मिरमध्ये परत 370 कलम आणायचे आहे. या देशाचे संविधान कुणीच बदलवू शकत नाही. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक दाखवत ते संविधान बदलायच्या गोष्टी करतात. मात्र नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत. असेही रामदास आठवले म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget