Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: RSS आणि भाजपच्या ज्या लोकांना वाटत की, कुटुंब सुरक्षित राहावे त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मतदान करू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: पार्टी विथ डिफरन्स असा नारा देणाऱ्या भाजपमध्ये सरसकट भ्रष्टाचारी, गुंड, बलात्काऱ्यांना प्रवेश दिला जात असतानाच चक्क बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्याने महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. लैगिक अत्याचार करणाऱ्याला भाजपने इनाम दिलं का? अशी विचारणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. काँग्रेसने सुद्धा हल्लाबोल केला आहे. आता पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा भाजपवर सडकून प्रहार केला आहे. आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षा ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका असा आवाहन त्यांनी केलं आहे.
आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 10, 2026
कारण, बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील जो सूत्रधार आहे. त्याला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे.
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना… pic.twitter.com/QIA0qdUZWZ
व्यभिचाराचा मार्ग आरएसएस आणि भाजपने अवलंबला
आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका. कारण, बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील जो सूत्रधार आहे. त्याला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे.भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भाजप प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्या पक्षात स्थान देत आहे. व्यभिचाराचा मार्ग आरएसएस आणि भाजपने अवलंबला आहे. हे जर थांबवायचं असेल तर, RSS आणि भाजपच्या ज्या लोकांना वाटत की, कुटुंब सुरक्षित राहावे त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मतदान करू नये.
चौफेर टीकेनंतर राजीनामा घेतला
चिमुरडींवर शाळेतच अत्याचार झाल्यानंतर बदलापुरात अक्षरश: आक्रोश झाला होता. यानंतर तब्बल 44 दिवस तुषार आपटे झाला होता. या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. दरम्यान, सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्याने संतापाचा उद्रेक झाला. चौफेर टीका केल्यानंतर नेहमीच विरोधकांना उडवून लावणाऱ्या भाजपने तातडीने अवघ्या काही तासात तुषार आपटेचा राजीनामा घेतला. मात्र, एमआयएमसोबत केलेल्या सोयरीकनंतर आता चक्क लैंगिक गुन्हेगारातील आरोपीला रेड कार्पेट अंथरल्याने भाजपची पुन्हा नाचक्की झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















