एक्स्प्लोर
पनवेलमध्ये नागरिकांचा 'नो वॉटर, नो वोट' म्हणत मतदानावर बहिष्काराचा इशारा
टॅंकरमाफियांचा फायदा होण्यासाठीच पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. तर टॅंकरचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आजार होत असल्याचे रहिवाशी बोलत आहेत.

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत येत असलेल्या काही भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोली, तळोजा, रोडपाली, भागात राहणाऱ्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. पनवेल महानगरपालिका, सिडकोकडून योग्यरित्या पाण्याचे नियोजन केले जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांनी No water ... No Vote चे बॅनर लावून लोकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
आठवड्यातून फक्त दोन-तीन दिवस पाणी येत असल्याने सोसायट्यांना पाणी पुरत नाही. यामुळे टॅंकरधारकांकडून पाणी मागवावे लागत असल्याने महिन्याला सोसायटीची रक्कम खर्च होत असून नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याबाबत अनेक वेळा पनवेल महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करूनही काहीच फरक पडलेला नाही. टॅंकरमाफियांचा फायदा होण्यासाठीच पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. तर टॅंकरचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने आजार होत असल्याचे रहिवाशी बोलत आहेत.
त्यामुळे पाणी देत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय अनेक सोसायटींनी घेतला आहे. No water ... No Vote चे बॅनर लावून लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. याचा फटका विधानसभेत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि महाआघाडीकडून शेकापचे हरेश केणी यांच्यात मुख्य लढत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
