एक्स्प्लोर

New Delhi Lok Sabha Election Result : नवी दिल्लीत भाजपची 7 जागांवर जोरदार मुसंडी, आप अन् काँग्रेस पिछाडीवर

New Delhi Lok Sabha Election Result : नवी दिल्लीत भाजपचे उमेदवार सर्व 7 जागांवर आघाडीवर आहेत. आप आणि काँग्रेसला नवी दिल्लीत अपेक्षित यश मिळालेलं नाही.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Result) मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता चार तास पूर्ण झालेले आहेत. भाजपला (BJP) मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी एकतर्फी पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. नवी दिल्लीमध्ये (New Delhi) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. भाजपनं नवी दिल्लीतील सात जागांवर आघाडी घेतली आहे. 

नवी दिल्ली पुन्हा एकदा भाजपकडे

नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल  हे काँग्रेसच्या जय प्रकाश अग्रवाल यांच्यापेक्षा पुढं आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत मनोज तिवारी आणि कन्हैय्या कुमार यांच्यात लढत होती. इथं मनोज तिवारी आघाडीवर आहेत. दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे हर्ष मल्होत्रा आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार लढत होते. 

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बांसुरु स्वराज आघाडीवर असून त्यांच्याविरोधात लढत असलेले सोमनाथ भारती पिछाडीवर आहेत. 

उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपचे योगेंद्र चंदोलिया आणि काँग्रेसचे उदित राज यांच्यात लढत होती. इथं योगेंद्र चंदोलिया आघाडीवर आहेत. 

पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमलजीत सेहरावत यांनी आघाडी घेतली आहे. इथं आम आदमी पार्टीचे महाबल मिश्रा यांच्यात लढत होती. 

अरविंद केजरीवाल यांची जादू चाललीच नाही?

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणी ईडीनं अटक केली होती. या अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, नवी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपनं वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.  नवी दिल्लीतील सात जागांवर भाजपनं पुन्हा एकदा आप आणि काँग्रेसवर आघाडी मिळवली आहे. 

दिल्लीत पुन्हा भाजप येणार?

नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी प्रमाणं यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे. 
 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. देशात एनडीए 270 जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडी 251 जागांवर आघाडीवर आहेत. 

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या: 

Lok Sabha Election Result 2024 : पश्चिम महाराष्ट्राच्या दहा जागांवर कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, जाणून घ्या एका क्लिकवर

Shirdi Lok Sabha Result 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर, सदाशिव लोखंडे पिछाडीवर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI चं कॅप्टन, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीतDevendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI चं कॅप्टन, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Embed widget