एक्स्प्लोर
बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचं बंडाचं निशाण, प्रीतम मुंडेंना पाठिंबा
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.
बीड : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रीतम मुंडेंना पाठिंबा दिला आहे. प्रीतम मुंडे यांना निवडणुकीत जिंकवण्यासाठी कामं करण्याचे आदेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
याबाबत क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण चालवतो? हेच कळत नाही." पक्षातील नव्या नेत्यांबाबत क्षीरसागर म्हणाले की, जे कानामागून आले ते तिखट झाले आहेत. काल आपल्या फेसबुक पेजवरुन लढा या शिर्षकाखाली त्यांनी एक पोस्ट केली होती. त्यानंतर क्षीरसागर मोठा निर्णय घेणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कालच्या 'लढा' या फेसबुक पोस्टमागचे कारण आज स्पष्ट झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement