एक्स्प्लोर
Advertisement
लोकसभा निवडणूक होऊ द्या, कोणता नेता कशामुळे भाजपमध्ये गेला कागदपत्रांसह सांगतो : अजित पवार
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. याबाबत बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष का सोडून गेली याची कागदपत्रासह माहिती देतो असा दावा केला आहे.
मुंबई : 'लोकसभा निवडणूक पार पडू द्या, कोणता नेता कशामुळे पक्ष सोडून भाजपमध्ये गेला ते कागदपत्रांसह सांगतो', असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. याबाबत बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष का सोडून गेली याची कागदपत्रासह माहिती देतो असा दावा केला आहे. तिकीट नाकारल्यामुळे यांनी पक्ष बदललेला नसून सरकारकडून दबाव आल्यामुळे तर काहींनी डोक्यावर शेकडो कोटींच्या कर्जाचा डोंगर असल्यामुळे यांनी पक्ष सोडला आहे, असं देखील पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेले तसेच काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे देखील भाजपमध्ये गेले. यांच्यासह राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतरही अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एकदा निवडणूक होऊ द्या. यापैकी प्रत्येक जण पक्ष सोडून का गेला, त्यामागचं कारण काय होतं, कुणाच्या पाठीमागं कोणता ससेमिरा लावण्यात आला होता याची कागदपत्रांसह माहिती देतो.
भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांबद्दल बोलताना पवार म्हणाले, "या नेत्यांपैकी कुणाला आपला कारखाना वाचवायला पैशाची मदत हवी होती म्हणून ते गेले. तर काहींच्या पतसंस्था, कारखाने अडचणीत आलेले होते. डोक्यावर कर्ज होतं म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतला".
डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "सुजय विखे यांना देखील राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यास आम्ही तयार होतो. त्याबाबत त्यांच्या पक्षातील वरिष्ठांशी त्यांची चर्चा देखील झाली होती. मात्र तरी देखील सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला".
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement