(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole : तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; 'मेरिट'चा मुद्दा काढत लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडून प्रदेश काँग्रेसला मोठा भाऊ, छोटा भाऊ असा विषय करू नये असे स्पष्ट सांगण्यात आले असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेरिटचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Nana Patole : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) जागा वाटपामध्ये ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) वर्चस्व राहिले होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये 21 पैकी नऊ जागा जिंकण्यात यश आलं आहे. काँग्रेसने मोठं यश मिळवताना 17 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.
नाना पटोलेंनी उपस्थित केला मेरिटचा मुद्दा
विधानसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपावरून वाद निर्माण होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मोठा भाऊ, छोटा भाऊ असा विषय करू नये असे स्पष्ट सांगण्यात आले असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेरिटचा मुद्दा उपस्थित केला आहे. पटोले यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मेरिटने जागा मिळाल्या असत्या, तर आणखी जागा वाढल्या असत्या असे म्हटले आहे.
ज्या भागांमध्ये आमचं वर्चस्व आहे त्या जागा आम्हाला मिळायला हव्यात
त्यामुळे आता आमचे मेरिट जास्त आहे, त्यामुळे ज्या भागांमध्ये आमचं वर्चस्व आहे त्या जागा आम्हाला मिळायला हव्यात, अशी आमची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ असा मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मेरिटच्या आधारावर जागावाटप व्हावं अशी आमची भूमिका होती. त्यानुसार जागावाटप झालं असतं, तर आम्हाला शंभर टक्के आणखी जागा मिळाल्या असत्या, असे ते म्हणाले.
तुम्हाला आता रिझल्ट दिसत आहे
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितले मी कोणावरही टीकेला उत्तर देणार नाही. मी कामात लक्ष देतो त्यामुळे तुम्हाला आता रिझल्ट दिसत आहे. कोणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नसल्याचे नाना पेटोले म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला जागावाटपात वर खाली होऊ शकतं, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या