LIVE UPDATE
- गोरेगाव विधानसभेत भाजपच्या विद्या ठाकूर विजयी
- कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहूल नार्वेकर विजयी
- बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी
- मुंबईत शिवसेनेला धक्का, वांद्रे पूर्वमधून महापौरांचा पराभव, काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी
- बोरीवली मतदारसंघात 10 हजारंहून अधिक मतं नोटाला, याचं मतदारसंघात विनोद तावडेंना तिकीट नाकारलं होतं
- वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार विजयी
- विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी
- वरळीतून आदित्य ठाकरे 30 हजारांनी आघाडीवर
- शिवडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी विजयी
- वांद्रे पूर्व मतदारसंघात विश्वनाथ महाडेश्वरांना फक्त 800 मतांची आघाडी
- घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात पराग शहांची विजयी आघाडी
- मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल 7295 मतांनी आघाडीवर
- भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव 8246 मतांनी आघाडीवर
- मलबार हिल विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- मुंबईत 36 पैकी 31 जागांवर महायुती आघाडीवर
वरळी - आदित्य ठाकरे, शिवसेना, मलबार हिल- मंगलप्रभात लोढा, भाजप, मुंबदेवी- पांडुरंग सकपाळ, शिवसेना, माहिम- सदा सरवणकर, शिवसेना, भायखळा- यामिनी जाधव, शिवसेना, चांदिवली - शिवसेना दिलीप लांडगे, शिवसेना, वांद्रे पूर्व- विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना, वांद्रे पश्चिम- आशिष शेलार, आघाडीवर
- मुंबईत मनसे आणि एमआयएमला एकाही जागेवर आघाडी नाही, शिवसेना आणि भाजप आघाडीवर
- चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप मामा लांडे 3000 मतांनी आघाडीवर
- मुंबादेवी मतदारसंघात पहिल्या फेरीत शिवसेना आघाडीवर, शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ 643 मतांनी आघाडीवर
- दादर-माहीम मतदारसंघात दुसरी फेरीअखेर शिवसेनेचे सदा सरवणकर आघाडीवर
- वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 11 हजार 843 मतांनी आघाडीवर
- माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांना आघाडी, तर संदीप देशपांडे पिछाडीवर
- चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर 1241 मतानी आघाडीवर
- घाटकोपर पश्चिममधून राम कदम आघाडीवर
- दहिसर मतदारसंघातून मनिषा चौधरींवर आघाडीवर
- वरळीतून शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आघाडीवर
- वांद्रे पूर्व मतमोजणी केंद्रावर पहिल्या फेरीतच ईव्हिएम मशिनचा डिस्प्ले बिघडला, मशिन दुरुस्त होईपर्यंत व्हिव्हीपँट स्लिपची मतमोजणी सुरु होणार
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाची धाकधूक संपली आहे. आपला राजकीय कैवारी निवडण्यासाठी जनतेने ईव्हीएमचं बटण दाबून दिलेला कौल आज जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला मात देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे. विधानसभेसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेली हाक मतदारांना भावलीय हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.
येणाऱ्या काही तासांत आपल्याला मुंबईतील 36 जागांवर कुणाचं वर्चस्व राहील हे कळणार आहे. तर मुंबईतील प्रमुख लढतींबाबत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर मुंबईच्या वरळीतून शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे किती मतांनी निवडणून येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर वांद्रे पूर्वतील बंडखोरीला शह देत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर निवडणून येणार का याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबई विधानसभा मतदारसंघ
178. धारावी विधानसभा मतदारसंघ - आशिष मोरे (शिवसेना) वि. वर्षा गायकवाड (काँग्रेस)
179. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप), वि. गणेश कुमार यादव (काँग्रेस)
180. वडाळा विधानसभा मतदारसंघ - कालिदास कोळंबकर (भाजप) वि. शिवकुमार लाड (काँग्रेस)
181. माहिम विधानसभा मतदारसंघ - सदा सरवणकर (शिवसेना) वि. प्रविण नाईक (काँग्रेस) वि. संदीप देशपांडे (मनसे)
182. वरळी विधानसभा मतदारसंघ - आदित्य ठाकरे (शिवसेना) वि. सुरेश माने (राष्ट्रवादी)
183. शिवडी विधानसभा मतदारसंघ - अजय चौधरी (शिवसेना) वि. उदय फणसेकर (काँग्रेस)
184. भायखळा विधानसभा मतदारसंघ - यामिनी जाधव (शिवसेना) वि. मधुकर चव्हाण (काँग्रेस), गीता गवळी (अभासे) वि. एजाज खान
185. मलबार हिल विधानसभा मतदारसंघ - मंगलप्रभात लोढा (भाजप) वि. हिरा देवासी (काँग्रेस)
186. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ - पांडुरंग सकपाळ (शिवसेना) वि. अमीन पटेल (काँग्रेस)
187. कुलाबा विधानसभा मतदारसंघ - राहुल नार्वेकर (भाजप) वि. अशोक (भाई) जगताप (काँग्रेस)
मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघ
152. बोरीवली - सुनिल राणे (भाजप) वि. कुमार खिलारे (काँग्रेस)
153. दहिसर - मनिषा चौधरी (भाजप) वि. अरुण सावंत (काँग्रेस)
154. मागाठणे- प्रकाश सुर्वे (शिवसेना) वि. मणिशंकर चौहान (राष्ट्रवादी)
155. मुलुंड - मिहीर कोटेचा (भाजप) वि. गोविंद सिंग (काँग्रेस)
156) विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना) वि. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)
157. भांडुप पश्चिम - रमेश कोरगांवकर (शिवसेना) वि. सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158. जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर (शिवसेना) वि. सुनिल कुमरे (काँग्रेस)
159. दिंडोशी - सुनील प्रभू (शिवसेना) वि. विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
160. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप) वि. अजंता यादव (काँग्रेस)
161. चारकोप - योगेश सागर (भाजप) वि. कालू करमनभाई बुधेलिया (काँग्रेस)
162. मालाड पश्चिम - रमेश सिंग ठाकूर (भाजप) वि. अस्लम शेख (काँग्रेस)
163. गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजप) वि. युवराज मोहिते (काँग्रेस)
164. वर्सोवा - भारती लवेकर (भाजप) वि. बलदेव खोसा (काँग्रेस) वि. राजुल पटेल (सेना बंडखोर)
165. अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप) वि. अशोक जाधव (काँग्रेस)
166. अंधेरी पूर्व - रमेश लटके (शिवसेना) वि. जगदीश आमीन (काँग्रेस)
167. विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप) वि. जयंती सिरोया (काँग्रेस)
168. चांदिवली - दिलीप लांडे (शिवसेना) वि. नसीम खान (काँग्रेस)
169. घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) वि. आनंद शुक्ला (काँग्रेस)
170. घाटकोपर पूर्व - पराग शाह (भाजप) वि. मनिषा सूर्यवंशी (काँग्रेस)
171) मानखुर्द शिवाजीनगर - विठ्ठल लोकरे (शिवसेना) वि. अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगर - तुकाराम काते (शिवसेना) वि. नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173. चेंबूर - प्रकाश फातर्पेकर (शिवसेना) वि. चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)
174. कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना) वि. ज्योत्स्ना जाधव (राष्ट्रवादी) वि. मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी)
175. कलिना - संजय पोतनीस (शिवसेना) वि. जॉर्ज अब्राहम (काँग्रेस)
176) वांद्रे पूर्व - विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) वि. झिशान सिद्दीकी (काँग्रेस) वि. तृप्ती सावंत (सेना बंडखोर)
177. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप) वि. आसिफ जकेरिया (काँग्रेस)