एक्स्प्लोर

ममता आणि मोदी एकसारखेच, राहुल गांधींचा टोला, बंगालमधील सभेला विक्रमी गर्दी

केंद्रातले सरकार आणि पश्चिम बंगालमधील सरकार लोकांना गृहीत धरुन काम करतात, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

कोलकाता : ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत एकसारखीच आहे. केंद्रातले सरकार आणि पश्चिम बंगालमधील सरकार लोकांना गृहीत धरुन काम करतात, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला विक्रमी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल यांच्या सभेला झालेली गर्दी पाहून ही घटना म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. राहुल यांनी काल (शनिवारी)तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनादेखील लक्ष्य केले. राहुल म्हणाले की, "केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार कोणाच्याही सल्ल्याशिवाय जनतेकडे दुर्लक्ष करुन काम करत आहेत. दोघांची कार्यशैली एकसारखीच आहे. मोदी आणि ममता दोघेही त्यांच्या भाषणांमध्ये खोटी आश्वासने देण्याचे काम करतात. नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. ते जिथे कुठेही जातात तिथे केवळ खोटं बोलत असतात." राहुल म्हणाले की, "डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे ममता बॅनर्जी काम करत आहेत. बंगालचा आवाज ममतांपर्यंत पोहचत नाही. बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. परंतु आता घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही आता केंद्रात सरकार बनवत आहोत. आम्ही हे बंद करु."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget