एक्स्प्लोर

Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?

Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 236 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापनेच्या बैठकांचं सत्र सुरु आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं विजय मिळवला. महायुतीला 236 जागांवर यश मिळालं. भाजपला 132 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 41 आणि शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतकं आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे. महायुतीच्या सरकारच्या स्थापनेबाबत दिल्लीत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदे, भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक पार पडली.  मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत देखील चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती जणांना संधी मिळू शकते याबाबत देखील चर्चा सुरु आहेत. राज्यघटनेत याबाबत घटक राज्यातील सरकारमध्ये किती मंत्री असावेत याबाबत माहिती आहे.

नव्या सरकारचा शपथविधी कधी?

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपच्या 20 ते 23 आमदारांना संधी मिळेल. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उर्वरित राहिलेल्या संख्येइतकी मंत्रिपदं मिळू शकतात. म्हणजे साधारणपणे दोन्ही पक्षांना 10 -10 मंत्रिपदं मिळू शकतात, अशा चर्चा आहेत.

राज्यातील मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत राज्यघटनेत काय म्हटलं? 

भारतीय संविधानाच्या सहाव्या भागात  कलम 164 मध्ये राज्य सरकारमधील मंत्र्यांबाबत नियम करण्यात आले आहेत. 

या कलमानुसार मुख्यमंत्री , राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांकडून नियुक्त केले जातील आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्रिपद धारण करतील. 

राज्यातील सरकारमध्ये मंत्री किती असावेत याबाबत देखील स्पष्टपणे राज्यघटनेत भाष्य करण्यात आलं आहे. 
कोणत्याही राज्याच्या मंत्रिपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या, त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

मात्र, काही राज्यांच्या विधानसभेची सदस्यसंख्या मी असल्यानं पंधरा टक्क्यांच्या नियमाला अपवाद असून तिथं मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी असत नाही.   उदा. झारखंड, गोवा 

महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 असल्यानं मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषदेतील सदस्यसंख्या 43 इतकी आहे. 288 च्या 15 टक्के या सूत्रानुसार 43 आमदारांना मंत्रिपद मिळेल.  महाराष्ट्रात विधिमंडळाची दोन्ही सभागृह असल्यानं या ठिकाणी विधानसभेसह विधानपरिषदेतील आमदारांना देखील मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. एखादा व्यक्ती दोन्ही सभागृहांचा सभासद नसल्यास त्याला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुढील सहा महिने संपण्याच्या अगोदर कोणत्याही एका मंत्रिमंडळाचं सदस्य होणं बंधनकारक असतं. 

दरम्यान, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री असे मंत्रिपदाचे प्रकार असून गेल्या अनेक वर्षांपासून उपमंत्री म्हणून कोणाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. कॅबिनेट आणि राज्यमंत्री  असे दोन प्रकार प्रामुख्यानं पाहायला मिळतात. 

इतर बातम्या :

Eknath Shinde: मोठी बातमी : महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार, महायुतीत मोठ्या घडामोडी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO

व्हिडीओ

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
Embed widget