(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुणाच्या बापात किती दम हे 23 तारखेला दिसेल, विजयराज शिंदेंनी स्वीकारलं संजय गायकवाडांचं आव्हान, बुलढाण्यात महायुतीचा वाद शिगेला
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात (Buldhana Vidhansabha Election) महायुतीतील वाद उफाळून आलाय. कुणाच्या बापात किती दम हे 23 तारखेला दिसेल असं म्हणत विजयराज शिंदेंनी आमदार संजय गायकवाडांचं आव्हान स्वीकारलंय.
Vijayraj Shinde Buldhana Election News : राज्यात राजकीय पक्षांना बंडखोरी मोठी डोकेदुखी ठरत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात (Buldhana Vidhansabha Election) महायुतीत आता मोठा वाद उफाळून आला आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना उमेदवारी मिळाली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान यावरुन संजय गाडकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला विजयराज शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले विजयराज शिंदे?
काल शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे हे चिल्लर केस असून त्यांच्या बापात दम असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी असं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर देत आज विजयराज शिंदे यांनी म्हटलं आहे की, कुणाच्या बापात किती दम आहे हे येत्या 23 तारखेला दिसून येईल. मला जर शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा एकही मत जास्त पडलं नाही तर मी येणाऱ्या काळात कुठलीही विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणाच शिंदे यांनी करुन टाकली आहे. त्यामुळे आता बुलढाण्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे . विधानसभा निवडणुका दोन आठवड्यावर असताना महायुतीतील हा वाद आता उद्यापर्यंत संपुष्टात आला नाही तर महायुतीला मोठा फटका या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे. भाजपाला सातत्याने अवमानित करणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवाराला आम्ही ताकद दाखवू. तसेच आमच्या भाजप पक्षाला, भाजप मतदारांना, कार्यकर्त्यांना सन्मानित करणार आहे. असेही ते म्हणाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण आले आहे. अशी माहिती स्वत: विजयराज शिंदे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय गायकवाड?
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. विजयराज शिंदे ही चिल्लर केस आहे. त्याच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढावीच असं ओपन चॅलेंज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलं आहे. त्यामुळं आता राजकीय वातावरण गरम झालं आहे.
महत्वाच्या बातम्या: